आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही : मुलाला जन्म दिल्यानंतर टीव्ही अभिनेत्री छवि मित्तलचा एक कान झाला खराब, रुग्णालयात आहे अॅडमिट 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : छवि मित्तल मुलाच्या जन्माच्या तीन दिवसांनंतर एका कानाने बहिरी झाली आहे. बुधवारी छविने मुलगा अरहानला जन्म दिला होता. डिलिवरीनंतर तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पण यामध्ये सर्वात मोठी समस्या ही आहे की, तिच्या एका कानाची ऐकण्याची क्षमता नाहीशी झाली. आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिने हा खुलासा केला. ती अजूनही रुग्णालयातच आहे.  

 

इंस्टाग्रामवर व्यक्त केले दुःख... 
अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'माझ्या पायांना अजूनही सूज आहे. सोबतच बॉडीच्या नेक पार्ट्समधेही सूज आहे. माझे डोके खूप दुखते आहे.  याचे कारण आहे पाठीचा कणा. 5 लीटर पाणी पिट आहे आणि प्रत्येक 15 मिनिटांना टॉयलेटला जात आहे. एवढेच नाही तर एका कानाने ऐकायलादेखील येत नाहीये. पण आपल्या पुढील वेब सीरीजसाठी मला काम करावे लागते आहे. त्यामुळे रात्री 1 वाजता जेव्हा माझा मुलगा झोपतो तेव्हा ऑफिसचे काम करू शकते आहे.' छविची पुढची वेब सीरीज 'बिन बुलाए मेहमान' आहे. ती याला डायरेक्ट करत आहे. 

 

10 व्या महिन्यात दिला मुलाला जन्म... 
छवि प्रेग्नन्सीदरम्यान एकदम फिट होती आणि शेवटच्या क्षणापर्यँत काम करत होती. सर्वात विचित्र गोष्ट ही होती की, छविने 9 व्या नाही तर 10 व्या महिन्यात मुलाला जन्म दिला, जी एक रेयर केस आहे. यासोबतच डिलेवरीनंतर ती एका कानाने बहिरी झाली. तीदेखील एक खूप रेयर केस आहे. 

बातम्या आणखी आहेत...