आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यावर बोल्ड सीन देण्यासाठी कम्फर्टेबल नाही 'खतरों के खिलाड़ी' ची ही कन्टेस्टंट, म्हणाली, असे सीन पाहून माझे पेरेंट्स खूप दुखावले जातील 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सध्या 'फियर फॅक्टर खतरों के खिलाड़ी 9' मध्ये दिसत असलेली अभिनेत्री जॅस्मिन भसीनचे म्हणणे आहे की, ती पडद्यावर बोल्ड सीन द्यायला कम्फर्टेबल नाही. हे तिने DainikBhaskar.com केलेल्या खास बातचीतीत सांगितले. ती म्हणाली, "दिल से दिल तक' नंतर मला अनेक शो ऑफर केले गेले. यामध्ये डेली सोप आणि काही वेब सीरीजही होत्या. मात्र, पण माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते माझे कम्फर्ट झोन. मी 'दिल तो हॅप्पी है जी' ला निवडले. कारण ते खूप वास्तवंडाशी होते. जिथे मला स्वतःचाच रोल कार्याचा होता. मला आव्हानांचा सामना करायला काही प्रॉब्लेम नाही. पण हो, मी त्यासाठी मर्यादा आखली आहे. जे मला बोल्ड सीन ऑफर केले जात असतील तर मी स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवते".  

 

पेरेंट्स असे सिन पाहून कम्फर्टेबल नाहीत...
- जॅस्मिन पुढे म्हणाली, "मी अशा एका कुटुंबातून आले आहे, जिथे मला माहित आहे की, माझे पेरेंट्स असे सिन पाहून कम्फर्टेबल नसतील. ज्या गोष्टींबद्दल नि निश्चित नाही, त्या गोष्टी मी करत नाही. त्यामुळे जर कधी अशा सीन्सची मागणी केली गेली तर मी ते कधीच करणार नाही". टीव्ही शो व्यतिरिक्त, जॅस्मिनने क्षेत्रीय चित्रपटातही आपले नाही आजमावले आहे. आत्तापर्यन्त तिने सापेक्ष जास्त साउथ इंडियन फिल्म केल्या आहेत. 

 

टीनएजमध्ये एक नातेवाईकाने केला सेक्शुअल असॉल्टचा प्रयत्न... 
- एका इंटरव्यूदरम्यान जॅस्मिन म्हणाली की, "जेव्हा मी टीनएजमध्ये होते, तेव्हा एका दूरच्या नातेवाईकाने मला सेक्शुअली असॉल्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्या घटनेनंतर माझा सत्य, सुरक्षा कौटुंबिक संबंधांवरून विश्वासच उडाला. एकटी आणि असुरक्षित त्या नाजुक वयामध्ये मी स्वतःला पुढे नेण्यासाठी संघर्ष केला. मी या घटनेबद्दल घरात सांगायला घाबरायचे. मला वाटायचे सगळे माझी चेष्टा करतील आणि मला अपमानित व्हावे लागेल. कित्तेक वर्ष त्या वाईट आठवणी मला छळत होत्या. आजही मला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो". 

 

एका कास्टिंग डायरेक्टरने केली होती कपडे काढण्याची डिमांड... 
- मागच्या वर्षी जेव्हा बॉलिवूडमध्ये #MeToo चे खूप परकरण समोर आले, तेव्हा जॅस्मिननेही एका कास्टिंग डायरेक्टरवर सेक्शुअल हैरेसमेंटचा आरोप केला होता. जॅस्मिननुसार, ती आपल्या एजेंसीच्या सल्ल्याने त्या कास्टिंग डायरेक्टरला भेटायला गेली होती. जेव्हा ती त्या डायरेक्टरला भेटली. त्याने तिला विचारले की, ती अभिनेत्री बनण्यासाठी काय काय करू शकते ? तिला कास्टिंग डायरेक्टरचा हेतू कळाला नाही. ती म्हणाली, "मी काय करू शकते. मी तर माझे कुटुंब आणि शहर सोडून इथे स्ट्रगल करत आहे". जॅस्मिनने सांगितल्यानुसार, त्या डायरेक्टरने तिला कपडे काढायला सांगितले होते, जेणेकरून हे कळेल की, ती बिकिनीमध्ये कशी दिसते. जॅस्मिन म्हणाली ती त्यावेळीच तेथून बाहेर पडली आणि डायरेक्टरला सांगितले की, तिची एजेंसी त्याच्याशी बोलेल. 

बातम्या आणखी आहेत...