आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

 टीव्ही अभिनेत्री नुपूर अंलकारवर ओढवले आर्थिक संकट, दागिने विकून भागवावा लागतोय घर खर्च

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुपूर अलंकार - Divya Marathi
नुपूर अलंकार

टीव्ही डेस्कः 'अगले जनम मोहे बिटिया कीजो' आणि 'स्वरागिनी' यासह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री  नुपूर अलंकार हिच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. दागिने विकून घर चालवण्याची वेळ तिच्यावर आली आहे.  का आली नुपूरवर ही वेळ...

  • नुपूरवर ही वेळ पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने आणलेल्या निर्बंधामुळे आली आहे. आरबीआयने ग्राहकांना पुढील सहा महिने केवळ 25 हजार रुपये काढण्याची मुभा दिली आहे. नुपूरचे सगळे अकाउंट याच बँकेत आहेत, त्यामुळे ती आर्थिक अडचणीत सापडली आहे.

काही वर्षांपूर्वी बँकेत ट्रान्सफर केली होती रक्कम... 

  • एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नुपूरने सांगितले, "मी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. माझे दुस-या बँकांमध्येही खाते होते. त्यातील रक्कम मी काही वर्षांपूर्वी पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत ट्रान्सफर केली होती. माझी आणि माझ्या कुटुंबीयांची संपूर्ण जमापुंजी याच बँकेत असल्याने आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत."

मित्रांकडून घेतले 50 हजारांचे कर्ज...  

  • नुपूरने सांगितले, 'आमच्याकडे आता घरात पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे माझ्याकडे घर चालवण्यासाठी दागिने विकण्याची वेळ आली आहे. इतकेच नाही तर माझ्यावर माझ्या को-अॅक्टरकडून तीन हजार रुपये उसणे घेण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत मी ओळखीतील लोकांकडून 50 हजारांचे कर्ज घेतले आहे.'

बँकेवर यासाठी आले निर्बंध... 

  • 24 सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने पीएमसीला नोटिस जारी केली होती. बँकेतील व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा सांगत पुढील 6 महिने सर्व व्यवहारावर निर्बंध घालण्यात आल्याचे RBIने पत्रात म्हटले आहे. या कारवाईमुळे PMC बँकेला नवी कर्ज देता येणार नाहीत, तसेच कोणत्याही ठेवी स्वीकारता येणार नाही.
बातम्या आणखी आहेत...