आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्ट मॅरेजनंतर मालदीवमध्ये हनीमून एन्जॉय करत आहे टीव्ही अॅक्ट्रेस, कधी बीचवर तर कधी शिपवर रोमँटिक अंदाजात दिसले दोघे, कपलने केली स्काय डायव्हिंग : Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः  'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत झळकत असलेली टीव्ही अभिनेत्री पारुल चौहान नव-यासोबत सध्या हनीमून एन्जॉय करत आहे. पारुल पती चिराग ठक्करसोबत मालदिवमध्ये हॉलिडे साजरा करत आहे. मालदीवपूर्वी या कपलने नेपाळमध्ये हनीमून साजरा केला होता. मालदीवमधील दोघांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये पारुल आणि चिरागर कधी बीचवर तर कधी शिपवर रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. इतकेच नाही तर दोघांनी स्काय डायव्हिंगचाही येथे आनंद लुटला. 12 डिसेंबर रोजी पारुलने टीव्ही अभिनेता चिराग ठक्करसोबत कोर्ट मॅरेज केले होते. चिरागसोबत पारुलची पहिली भेट 2015 मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झआली होती. लग्नापूर्वी तीन वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

 

कधीकाळी सावळ्या रंगामुळे  पारुलला ऐकावे लागले होते टोमणे

- 2007 मध्ये अभिनय करिअरची सुरुवात करणा-याला पारुलसाठी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणे म्हणावे तितके सोपे नव्हते. सावळ्या रंगामुळे तिचे अनेकदा रिजेक्शन झाले होते. इतकेच नाही तर सावळ्या रंगामुळे तिला ऑडिशनवेळी टोमणेही ऐकावे लागले होते. 
 

लग्नासाठी साठवलेले पैसे देऊन आईने पाठवले होते अभिनय क्षेत्रात... 
पारुलने एका मुलाखतीत तिच्या संघर्षाच्या दिवसांविषयी सांगितले होते. ती म्हणाली होती, "4 महिने हॉस्टेलमध्ये असताना एक वेळेचा टिफिन मागवायचे. त्यातील दोन पोळ्या सकाळी आणि दोन पोळ्या रात्री जेवायचे. आईने त्याकाळात माझ्या लग्नासाठी जमवलेले पैसे मला देऊन अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित केले होते. 4 महिन्यांच्या स्ट्रगलनंतर मला बालाजीच्या एका मालिकेत छोटीशी भूमिका मिळाली होती. मुंबईतील गोरेगांव येथील एनएनपी सोसायटीला स्ट्रगल सोसायची म्हटले जाते. येथे देशभरातील स्ट्रगलर राहतात. जेव्हा मला छोट्या छोट्या भूमिका मिळणे सुरु झाले, तेव्हा मी या सोसायटीत माझ्या भावासोबत राहात होती. "

 

या शोजमध्ये झळकली आहे पारुल...
पारुल चौहानने आतापर्यंत अनेक टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. 2007 मध्ये तिची पहिली मालिका 'बिदाई' आली होती. त्यानंतर ती 'झलक दिखला जा-3' (2009), 'रिश्तों से बडी प्रथा' (2011), 'अमृत मंथन' (2012), 'पुनर्विवाह' (2013) 'मेरी आशिकी तुमसे ही' (2016) या मालिकांमध्ये झळकली. सध्या ती स्टार प्लसवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' (2017)मध्ये दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...