आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • TV Actress Ruhi Chaturvedi Said About Her Future Husband, "Shivinder Is Very Shy, He Ignored Me When He Saw Me For The First Time"

टीव्ही अभिनेत्री रुही चतुर्वेदी भावी पतीबद्दल म्हणाली, 'शिवेंद्र खूपच लाजाळू आहे, पहिल्यांदा मला पाहून त्याने दुर्लक्ष केले हाेते' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमेशकुमार उपाध्याय

एंटरटेन्मेंट डेस्क : 'कुंडली भाग्य'मध्ये शर्लिन खुराणाच्या पात्रामधून घराघरात लोकप्रिय झालेली रुही चतुर्वेदी डिसेंबरमध्ये शिवेंद्र ओम सान्यालसोबत लग्न करणार आहे. या मुलाखतीत तिने आपला भावी पती, करिअर आणि भाविष्याच्या प्लॅनिंगविषयी चर्चा केली...,

शिवेंद्रसोबत तुझी पहिली भेट कधी आणि कुठे झाली आणि गोष्ट लग्नापर्यंत कशी गेली ?
आम्ही गेल्या १५ वर्षांपासून मित्र आहोत. शिवेंद्र पहिल्यांदा जिममध्ये दिसला हाेता. ताे खूपच लाजाळू अाहे, त्याने पहिल्यांदा माझ्याकडे दुर्लक्ष केले हाेते. मला जिममधील त्याची पहिली भेट आजही अाठवते. जिममध्ये कोणत्या मशीनवर काय करत होता, काय परिधान केले होते, कपड्यांचा रंगदेखील लक्षात अाहे. पण ती गोष्ट तिथेच संपली हाेती. त्यानंतर, एका सामान्य मित्राने अामची भेट घालून दिली. त्यानंतर आमची ओळख झाली आणि मित्र बनलाे. आमची खूप काळ मैत्री होती. अामचे भांडणेही व्हायचे कारण दोघांचा स्वभाव वेगळा आहे. दरम्यान, आम्ही दोघांनी कंगना या राजस्थानी चित्रपटात काम केले. आता आमच्या स्वभावात बदल झाला आहे. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो, तेव्हा कुटुुंबही भेटले आणि लग्न जमले.

शिवेंद्रमधील एखादी गोष्टी जी तुला खूपच आवडली असेल ?
त्याचा स्वभाव. तो कुटुंबाला धरून चालणारा आणि संतुलित जीवन जगणारा व्यक्ती आहे. विचार करू बोलतो. हीच त्याच्यात चांगली गोष्ट आहे.

लग्न कधी, कोणत्या रीतिरिवाजाने करणार ?
आम्ही दोघे राजस्थानी आहेत, तर राजस्थानी प्रथेने पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये जयपूरमध्ये लग्न होईल.

लग्नानंतर किती दिवस सुटी घेणार आणि हनिमूनसाठी कुठे जाणार?
'कुंडली भाग्य' मध्ये फारशी रजा मिळत नाही. २८ नोव्हेंबरपासून ते ८ डिसेंबरपर्यंत या काळात मला ९ दिवसांची सुट्टी मिळाली आहे. आम्ही आत्ता हनिमूनवर जाऊ शकत नाही, कारण लग्नासाठी आधीच बरेच दिवस सुटी घेतली आहेत. नवीन वर्षातही सुट्टी घ्यावी लागेल आणि ते मकर संक्रांतीवर राजस्थानला जाणार आहे. म्हणून मी फेब्रुवारीमध्ये हनिमूनला जाईन. मी कुठे जाणार? हे अद्याप ठरले नाही.

इंडस्ट्रीमधून लग्नात कोण सामील होणार?
मी संपूर्ण 'कुंडली भाग्य ' टीमला आमंत्रित केले आहे. अंजुम फकीह, श्रद्धा आर्य, संजय डडलानी, अभिषेक कपूरसह काही लोकांची तिकिटे आरक्षित झाली आहेत, ते नक्कीच येतील.

कोणत्या डिझायनरचा पोशाख घालणार ?
मी रिसेप्शनवर गाऊन घालणार आहे. तो स्वप्निल शिंदे डिझाइन करणार आहेत. मी लग्नात लाल रंगाचा लेहंगा घालणार आहे, परंतु अद्याप डिझाइनर डिसाइड झाला नाही. मला आधुनिक लूकबरोबरच पारंपारिक लुक हवा आहे.

लग्नाच्या तयारीसाठी फिटनेसकडे बरेच लक्ष देत असल्याचे एेकले?
होय, मी जेवण आणि त्वचेकडे लक्ष देत आहे, कारण प्रत्येक मुलीची इच्छा असते की, लग्नात सुंदर दिसावे. मी आठवड्यातून ६ दिवस जिममध्ये जाते. दररोज दीड तास व्यायाम करते. तेलकट आणि बाहेरचे पदार्थ खात नाही. गोड कमी केले.

करिअरच्या प्रवासाबद्दल काय सांगणार?
मागे वळून पाहताना माझा खूप चांगला प्रवास झाला आहे, असे वाटते. मी 'कुंडली भाग्य' हा 'बालाजी'ची मालिका करत आहे. 'बालाजी' चा शो मिळवण्यासाठी लोकांचे आयुष्य निघून जाते. मी खूप भाग्यवान आहे, या शोद्वारे मी घरोघरी लोकप्रिय झाले आहे.