आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अनुपमा'मधील भूमिकेबाबत रूपाली गांगुली म्हणाली, ‘कथ्थक खूप अवघड, शिकण्यासाठी मला बराच सराव करावा लागला’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः टीव्ही अभिनेत्री रूपाली गांगुली लवकरच ‘अनुपमा’मालिकेत दिसणार आहे. सध्या ती अहमदाबादेत चित्रीकरण करत आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत या मालिकेशी संबंधित खास गोष्टी आमच्याशी शेअर केल्या आहेत..

  • ‘अनुपमा’मध्ये तू एका गुजराती गृहिणीची भूमिका साकारत आहेस. यासाठी काय तयारी करावी लागली?

मला गुजरात शहर, गुजराती जेवण आणि तेथील संस्कृतीही आवडते. मी या शहरात येेते तर असे वाटते की, या शहराशी काहीतरी संबंध आहे. अनुपमाचे पात्र माझ्यासाठी खूप खास आहे. तिच्याकडे खूप धैर्य आणि अंतर्गत ऊर्जा आहे, जी हसत हसत सर्व परिस्थिती सांभाळते. तिने लग्न लवकर केल्यामुळे तिचे शिक्षण अर्धवट राहिले. हे तिच्या कुटंंबाला आवडले नव्हते. अनुपमामध्ये एक प्रतिभा आहे. ती एक उत्कृष्ट कथ्थक नृत्यांगना आहे. खरं सांगू, कथ्थक एक खूप अवघड नृत्य प्रकार आहे, मला त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले. मला सूर्यमंदिरात अनवाणी नृत्य करावे लागले, खरंतर ते खूप कठीण होते. मात्र, मला हेच दृश्य खूप आवडले. मी सध्या दररोज अनुपमा म्हणूनच जीवनाचा आनंद घेत आहे.

  • अहमदाबादेत पुन्हा येण्याचे कारण आहे?

मी बऱ्याच वेळा येथे कामानिमित्त येते. मी सांगितल्याप्रमाणे मला येथे राहायला आवडते. अहमदाबाद एक सुंदर शहर झाले आहे आणि या शहराचे आकर्षण निर्माण झाले आहे की, पुन्हा पुन्हा यावेसे वाटते.

  • शहरतील चित्रीकरणाचा अनुभव ...

अहमदाबादमध्ये चित्रीकरणादरम्यानचा अनुभव खूप चांगला हाेता. आम्ही सूर्य मंदिरात चित्रीकरण केले. जे एक हिंदू मंदिर असून मेहसाणा जिल्ह्यातील मोढेेरा गावात आहे. हे 1000 वर्षांपूर्वी बांधलेले आहे.

  • चित्रीकरणादरम्यान तुला अहमदाबाद शहरात काही खास खायला वेळ मिळाले का?

हो, आम्ही सूर्य मंदिरात चित्रीकरण करत होतो. मला सुंदर ठिकाणी चित्रीकरण करायला आवडते. गुजराती जेवणही रुचकर आहे. माझे आवडते ठिकाण अहमदाबाद असल्यामुळे मी येथेचे येते. येथील प्रसिद्ध हॉटेल अगाशियेमध्ये मी नेहमी जाते, हे माझे आवडते हॉटेल आहे. येथील चमचमीत जेवण मला खूप आवडते.

  • मोनिशाच्या पात्रामुळे तुला खूप प्रसिद्धी मिळाली. तुझ्या इतर भूमिकांपेक्षा अनुपमाची भूमिका किती वेगळी आहे?

तसे पाहिले तर मोनिशाचे पात्र अनुपमापेक्षा खूप वेगळे आहे. मोनिशाचे पात्र साधेभोळे आहे, परंतु अनुपमाचे पात्र हे खूप पक्क्या निश्चियाचे आहे. तिने आपल्या कुटुंबासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. अनुपमाच्या पात्राने माझ्यातील अभिनय कौशल्य जास्त चांगले झाले आहे. या पात्रामुळे माझ्या अभिनय कौशल्याला हातभार लावण्यास खूप मदत होत आहे.

बातम्या आणखी आहेत...