आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका मुलीची आई आहे टीव्हीची पार्वती, 46 वर्षांची असूनही आहे अनमॅरिड, कधी एक बिजनेसमॅनसोबत गुपचूप लग्न केल्याची झाली होती चर्चा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : टीव्हीची पार्वती म्हणजेच अभिनेत्री साक्षी तन्वर आज 46 वर्षांची झाली आहे. 1973 साक्षी छोट्या पडद्यावर खूप प्रसिद्ध आहे. साक्षीने अजूनही लग्न केलेले नाही. मात्र, 2015 अशी चर्चा झाली होती कि तिने एक बिजनेसमॅनसोबत गुपचुप लग्न केले आहे पण साक्षीने या बातमीचे खंडन केले आणि ती म्हणाली, "या बातमीमध्ये कोणतीही सत्यता नाही. मला अजूनपर्यंत असे कुणी नाही मिळाले, ज्याच्याशी मी लग्न करू शकेन. साधारणपणे लोक प्रेम मिळवतात, पण माझ्या केसमध्ये प्रेमाला मला मिळवावे लागेल. माझी मान्यता आहे की आपला जन्म, लग्न आणि निर्णय आधीपासूनच ठरलेले अस्तरात. माझा लग्नावर पूर्ण विश्वास आहे . आपल्या कुटुंबात मी अनेक सक्सेसफुल लग्न पहिले आहेत". साक्षीने ऑक्टोबर 2018 मध्ये 8 महिन्यांची एक मुलगी अडॉप्ट केली आहे, जिचे नाव दित्या आहे. साक्षी मुलीला देवी लक्ष्मीचे वरदान मानते. त्यामुळे तिने मुलीचे नाव दित्या ठेवले, जे देवी लक्ष्मीचेच एक नाव आहे. या नावाचा अर्थ प्रार्थनांचे फळ देणारी असा आहे. साक्षी शेवटची वेब सीरीज 'कर ले तू भी मोहब्बत' मध्ये राम कपूरच्या अपोजिट दिसली होती. 

 

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी IAS ची तयारी करत होती साक्षी...
- साक्षीचा जन्म राजस्थानच्या अलवरमध्ये झाला. ती एक मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. तिचे पिता राजेंद्र सिंहर तन्वर एक रिटायर्ड सीबीआय ऑफिसर आहे. साक्षीने आपले शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय येथून केले आणि दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून ग्रॅजुएशन पूर्ण केले. 
- ग्रेजुएशननंतर जेव्हा साक्षी आयएएसची तयारी करत होती. तेव्हा तिच्या एक जवळच्या मित्राने तिला दूरदर्शनच्या एका कार्यक्रमासाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला. फिल्मी गाण्यांवर आधारित या कार्यक्रमाचे नाव 'अलबेला सुर मेला' असे होते. या कार्यक्रमाच्या अँकरिंगसाठी साक्षीची निवड झाली. येथूनच साक्षीने टेलिव्हिजनकडे आपली वाटचाल सुरु केली. 
- सीरियल 'बडे़ अच्छे लगते हैं' मध्ये साक्षीचे लव्ह मेकिंग सीन्स खूप चर्चेत राहिले. तिने राम कपूरसोबत लिप-लॉक दिला होता. त्यांचा तो बेडरूम सीन खूप चर्चेत होता. 

अँकरिंगने केली होती साक्षीने आपल्या करियरची सुरुवात... 
- साक्षीने आपल्या करियरची सुरुवात दूरदर्शनवर एका अँकरच्या रूपाने केली होती. तिने गाण्यांवर आधारित कार्यक्रम 'अलबेला सुर मेला' मध्ये अँकरिंग केले. त्यांनतर ती छोट्या पडद्यावरील अनेक डेली सोपमध्ये दिसली. 
- सीरियल 'कहानी घर घर की' हा तिच्या करियरचा टर्निंग पॉईंट होता. या सीरियलमध्ये तिने पार्वती अग्रवालची भूमिका केली होती आणि ती खूप प्रसिद्धही झाली होती. या कॅरेक्टरद्वारे साक्षीने प्रत्येक घरात आपली जागा बनवली. स्टार प्लस चॅनेलवर प्रसारित होणारी ही सीरियल 2000 ते 2008 पर्यंत खूप चालली. 
- साक्षीने 'देवी' (2003), 'बड़े अच्छे लगते हैं' (2011-14) '24' (2016) अशा सीरियल्समध्ये काम केले. साक्षीने 2016 मध्ये आलेल्या 'दंगल' चित्रपटात आमिर खानच्या पत्नीचा रोल केला होता. तीने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर बेस्ट अक्ट्रेससाठी इंडियन टेली अवॉर्ड जिंकला आहे. 

बातम्या आणखी आहेत...