आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • TV Actress Sara Ali Khan Trolled For Lip Surgery: Social Media User Commenting Badly On Sara New Look

टीव्ही अभिनेत्रीने लिप सर्जरी करुन पोस्ट केला नवीन फोटो, सोशल मीडिया यूजर्सने सुरु केली प्रश्नांची सरबत्ती, यूजर्स म्हणाले - सांग तरी तुझा चेहरा कसा बिघडला 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. टीव्ही अभिनेत्री सारा अली खानला तिच्या न्यू फोटोमुळे ट्रोल केले जात आहे. तिने थोडे वेगळे दिसण्यासाठी आपली लिप्स सर्जरी केली आहे. सर्जरीनंतर साराने जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, यामुळे ती ट्रोल होत आहे. ट्रोलर्सने साराच्या ओठांवर वाईट कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, "चांगली नॅचरल ब्यूटी होती, हे काय केले?" तर दूस-या यूजरने लिहिले, "खुप जास्त वाईट आणि भितीदायक दिसतेय, तुझी सर्जरी बिघडली आहे." या निगेटिव्ह कमेंट्सवर साराने आतापर्यंत काहीच उत्तर दिलेले नाही. खरेतर साराला चाहत्यांना सरप्राइज द्यायचे होते. पण तिच्यासोबत हे चुकीचे घडले. 

 

पब्लिसिटीसाठी साराने केले होते लग्न 
2010 मध्ये सारा वादांमध्ये अडकली होती. तिने 'बिग बॉस-4' मध्ये कंटेस्टेंट अली मर्चे्ंटसोबत लग्न केले होते. पण या दोघांचा दोन महिन्यांनंतरच घटस्फोट झाला. सूत्रांनुसार सारा आणि अलीचा हा पब्लिसिटी स्टंट होता. शो जिंकण्यासाठी त्यांनी असे केले होते. दोघांच्या एका जवळच्या मित्राने याचा खुलासा केला होता. त्यांना या लग्नाची 50 लाख रुपये रक्कम मिळाली होती. पण चॅनलने या गोष्टींचे खंडन करत म्हटले होते की, त्यांनी हे लग्न सारा आणि अलीच्या इच्छेखातर लावले होते. तर अली मर्चेंटने रियलटी शो 'सच का सामना'मध्ये म्हटले होते की, त्यांनी हे लग्न फक्त पब्लिसिटीसाठी केले होते आणि ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. 

 

बिदाई मालिकेतून केला होता डेब्यू 
- सपना बाबुल का.. बिदाई आणि 'राम मिलाए जोडी' सारख्या मालिकांमध्ये साराने काम केले आहे. साराचा जन्म मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये झाला होता. 
- साराने 2007 मध्ये स्टार प्लसवरील प्रसिध्द शो 'सपना बाबुल का...बिदाई' मधून छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले. यानंतर ती रियलिटी शो  'बिग बॉस-4' (2010, कंटेस्टेंट), 'राम मिलाई जोड़ी' (2012-2013), रियलटी शो 'वेलकम -बाजी मेहमान-नवाजी की' (2013, कंटेस्टेंट) 'एनकाउंटर' (2014) यांसारख्या शोजमध्ये दिसली. 

बातम्या आणखी आहेत...