आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरुवातीला शेअर केला न्यूड फोटो, लोकांनी बुरखा घालण्याचा सल्ला दिल्यानंतर केली होती शिवीगाळ, आता या अभिनेत्रीला मागावी लागली माफी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'सपना बाबुल का...बिदाई' आणि 'राम मिलाए जोडी' या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री सारा खान हिला तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी माफी मागावी लागली. अलीकडेच  'ब्लॅकहार्ट'  या गाण्याच्या लाँचवेळी तिने ट्रोलर्सना शिवीगाळ केली होती. आता  सारा (29) ने सोशल मीडियावरही एक व्हिडिओ शेअर करुन माफी मागितली आहे. या व्हिडिओत सारा म्हणतेय की, तिचे शब्द आणि बोलण्याची पद्धत चुकीची होती, पण तिचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. सारा म्हणाली, तिला इस्लामच नव्हे तर कुठल्याही धर्मावर बोट ठेवण्याचा अधिकार नाही. चुक की मनुष्याकडूनच होते, त्यामुळे मी माफी मागतेय, असेही ती या व्हिडिओत म्हणाली.


काय आहे संपूर्ण प्रकरण... 

- झाले असे की, साराने 'ब्लॅकहार्ट' या गाण्याच्या पोस्टरसाठी न्यूड पोज दिली होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर बरीच टीका झाली होती. साराला यूजर्स म्हणाले होते की, तू मुस्लिम आहेस, असे अंगप्रदर्शन करण्याऐवजी तुला बुरखा घालायला हवा. तिला ट्रोल करणा-यांना साराने साँग लाँचवेळी प्रतिउत्तर दिले होते. सारा म्हणाली होती की, बुरखा घालण्याचा सल्ला देणा-यांना स्वतःची लाज वाटायला हवी. साराने या लोकांना शिवीगाळ करत म्हटले होते की, त्यांनी महिलांचा सन्मान करायला हवा, कारण महिलेच्या गर्भातूनच ते जन्माला आले आहेत. साराचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला सोशल मीडिया यूजर्सनी चांगलेच खडे बोल सुनावले होते. त्यानंतर साराला तिच्या चुकीची जाणिव झाली आणि तिने लोकांची माफी मागितली.

 

बातम्या आणखी आहेत...