आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अभिनेत्रीने आई आणि सासूसोबत रिसेप्शनमध्ये दिली पोज, डायमंड नेकलेससोबत नेसली आजीने दिलेली बनारसी साडी, साक्षी तन्वर-ईशान खट्टरसह पोहोचले हे सेलेब्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री श्वेता बसू प्रसादने लग्नानंतर मित्र आणि नातेवाईकांसाठी एका ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन केले होते. मुंबईतील रमाडा प्लाजा हॉटेलमध्ये ही रिसेप्शन पार्टी रंगली. या खास दिवशी श्वेताने तिच्या आजीने (आईची आई) तिला भेट म्हणून दिलेली बनारसी साडी नेसली होती. सोबतच तिने अनकट डायमंडचा नेकलेस घातला होता. हा नेकलेस तिला तिची नातेवाईक असलेल्या सुमन मित्तल यांनी भेट म्हणून दिला होता. श्वेताने सोशल मीडियावर मीडियावर एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये ती आई आणि सासूबाईंसोबत दिसतेय. रिसेप्शनमध्ये 'बडे अच्छे लगते हैं' फेम साक्षी तन्वर, 'जोधा अकबर'मधील अभिनेता चेतन हंसराज, 'कुमकुम भाग्य'मध्ये झळकत असलेली अभिनेत्री श्रुती झा, आई नीलिमा अजीमसोबत ईशान खट्टर, पत्नी दीप्तीसोबत श्रेयस तळपदे, दिग्दर्शक विशाल भारद्वाजसह अनेक सेलेब्स पोहोचले होते. श्वेताने 13 डिसेंबर रोजी बॉयफ्रेंड रोहित मित्तलसोबत लग्न केले.

 

लग्नापूर्वी चार वर्षे होते दोघे रिलेशशिपमध्ये...
- 'चंद्रनंदिनी' या गाजलेल्या टीव्ही मालिकेत झळकलेली अभिनेत्री श्वेता लग्नापूर्वी चार वर्षे रोहितसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर दोघांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले.
- श्वेता आणि रोहित यांनी पुण्यात बंगाली आणि मारवाडी पद्धतीने लग्न थाटले. श्वेता बंगाली तर रोहित मारवाडी कुटुंबातून आहे. याचवर्षी जून महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.

 

स्क्रिप्ट कन्सलटंट आहे श्वेता
- श्वेताने 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटात अभिनेता वरुण धवनच्या वहिनीची भूमिका वठवली होती. आता श्वेता अनुराग कश्यपच्या फँटम या प्रॉडक्शन हाऊसमध्ये स्क्रिप्ट कन्सलटंट म्हणून गेल्या दीड वर्षांपासून काम करत आहे.
- रोहितसोबतची तिची पहिली भेट याच प्रॉडक्शन हाऊसमध्ये झाली. श्वेताने 'मकडी', 'इकबाल', 'वाह लाइफ हो तो ऐसी'  या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
- बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर श्वेता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळली. चित्रपटांसोबतच श्वेताने 'कहानी घर-घर की', 'करिश्मा का करिश्मा' या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...