आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तंत्र विद्येने सुपरस्टार बनवतो, असे सांगून तो माझा टी-शर्ट काढत होता'- सोनल वेंगूलकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. #Metoo कँपेनमध्ये आता अभिनेत्री सोनाली वेंगूलकरचे नावही जोडले गेले आहे. सोनालीने प्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर आणि फोटोग्राफर राजा बजाजवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. 'ये वादा रहा', 'शास्त्री सिस्टर्स', 'साम दाम दंड भेद' सारख्या शोजमध्ये तिने काम केले आहे. सोनालीने एका मुलाखतीत आपली आपबिती सांगितली. तिने सांगितले की, ती तेव्हा अवघ्या 19 वर्षांची होती आणि इंडस्ट्रीमध्ये अॅक्ट्रेस बनली नव्हती. तेव्हा राजाने तिचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता. 


तांत्रिमक विद्याचे सांगितले कारण 
- सोनालीने सांगितले की, "तेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये सेटेल होण्याचा प्रयत्न करत होते. माझी भेट टीव्ही अॅक्ट्रेस शीना बजाजचे वडील राजा बजाज यांच्यासोबत झाली. मला ऑडिशनसाठी बोलावण्यात आले, तिथे राजा पहिलेच होते. बोलत  असताना त्यांनी मला सांगितले की, त्यांची मुलगी 55 हजारांपर्यंत कमाई करते."
- "राजाने मला भूमिका मिळवून देण्याचा विश्वास दिला. माझी ऑडिशन चांगली नव्हती. यानंतर त्यांनी मला स्वतःला असिस्ट करण्यास सांगितले, यातून मी बारकावे शिकावे असे ते म्हणाले. यानंतर ते मला शूटसाठी लोणावळा येथे घेऊन गेले. या शूटमध्ये मॉडल आणि त्यांची आईही होती. तिथे माझ्या कुटूंबातील एक सदस्यही होते."
- "शूट दरम्यान त्यांनी मला कपडे बदलण्यास सांगितले. मला योग्य वाटले नाही, तरीही मी गेले. मागून राजा आले आणि एक क्रीम दिली आणि ब्रेस्टवर लावण्यास सांगितले. मी हैराण झाले होते आणि मी नकार दिला. त्याने माझ्यासोबत जबरदस्ती केली, मी कशी तरी बाहेर पडले."
- सोनालीने सांगितले की, "आम्ही रिसॉर्टमध्ये होतो तेव्हाच रात्री तो माझ्या खोलीमध्ये जबरदस्तीने घुसला. तो मला म्हणाला की, मला एक तांत्रिक विद्या शिकवतील यामुळे मी एका रात्रीत सुपरस्टार बनेल. यासाठी मला माझे पुर्ण कपडे काढून बसावे लागेल आणि त्याचे सगळे ऐकावे लागेल."
- "मला काही कळण्यापुर्वीच त्याने माझे टी-शर्ट काढणे सुरु केले. मी त्याला धक्का देत निघून गेले आणि कशीबशी दुस-या खोलीमध्ये गेले. घटनेनंतर मी राजाला फोन केला तर त्याने उचलला नाही नंतर मी त्याची पत्नी अंजू बजाजला फोन करुन सर्व हकीकत सांगितली."
- "अंजूजीने मला गप्प राहण्यास सांगितले आणि कोणतीही कायदेशीर कारवाई करु नको यासाठी विनंती केली. नंतर त्यांनी मला घरी बोलावले, मी माझ्या फ्रेंडला घेऊन गेले. कारण मला खुप भिती वाटत होती."
- "आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा माझ्या फ्रेंडने राजाला कानाखाली मारली, तो आमच्या पायावर लोटांगण घेत होता. त्याने आरोप लावले की, मी 3 लाख रु. मागितले होते, असे असते तर मी एफआयआर का केला असता आणि त्याला रात्रभर तरुंगात का राहावे लागले असते."
डायरेक्टरच्या सपोर्टमध्ये आली मुलगी 
- राजा बजाजची मुलगी आणि अभिनेत्रीने शीना बजाजने वडिलांना सपोर्ट केला आहे. हे संपुर्ण ब्लॅकमेलिंगचे प्रकरण आहे असे ती बोलली.
- शीना म्हणाली - "हे आरोप खोटे आहेत. सोनल पैशांसाठी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल करत आहे. तिच्यासोबत काही चुकीचे घडले असते तर ती पोलिस स्टेशनमध्ये गेली असती, तिने माझ्या आईला कॉल करुन पुर्ण स्टोरी सांगितले नसती."
- पहिले तिने आम्हाला फोन करुन 5 लाखांची डिमांड केली होती, पण आम्ही तिला पैसे देण्यास नकार दिला होता. नंतर तिने 3 लाख मागितले आणि नंतर 1.5 लाखांवर आली. माझ्या वडिलांनी तिला पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला होता.
- पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सोनाली आम्हाला रोज फोन करुन विचारायची की, जर आम्ही तिला पैसे दिले तर ती केस मागे घेईल. 
 

बातम्या आणखी आहेत...