आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tv Actress Tina Revealed A Truth About Her Boyfriend

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'माझा बॉयफ्रेंड मला शिव्या देत होता आणि मारतही होता, पण नंतर मात्र त्याने मर्यादा ओलांडली\', टीव्ही शो \'उतरन\' च्या अभिनेत्रिने सांगितली आपली दुःखद कथा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही शो 'उतरन' फेम टीना दत्ता सध्या आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. पाहियल्यांदा टीनाने आपल्या अब्यूसिव रिलेशनशिप विषयी काही सांगितले. एक्स बॉयफ्रेंबद्दल टिनाने सांगितले की कसे तिला हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. टीनाने सांगितले की, ती एका नॉन इंडस्ट्री पर्सनला डेट करत होती. तो तिला शिव्या द्यायचा आणि मारायचाही. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर टिनाने हे माते शेवटी तोडून टाकले. 


मित्रांसमोर जेव्हा बॉयफ्रेंडने उचलला टीनावर हात... 
- टीनाने सांगितले, "जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते. मी ते नाते वाचवण्यासाठी खूप काही केले. एवढे की मी त्याचा मारदेखील खाल्ला. मी एका अशा नात्यात होते जिथे रोज माझ्यावर हिंसाचार व्हायचा". 

- "मला तरीसुद्धा त्याच्यासोबत राहायचे होते. पण हद्द तेव्हा झाली जेव्हा त्याने मला माझ्या मित्रांसमोर मारायला सुरुवात केली. मग मी हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला". 

- टीना पुढे म्हणाली, "मला आधीपासूनच लव्ह मॅरेज करायचे होते, पण असे होऊ शकले नाही. मला नेहमी या गोष्टीचे दुःख राहील. हे रिलेशनशिप संपल्यानंतर आता मी आयुष्यात पुढे आले आहे. आज एकटी मी जास्त खुश आहे. आता मी कोणत्याही अशा नात्यासाठी वेळ वाया घालवू इच्छित नाही". 

- टीनाने 2015 मध्ये आपल्या बॉयफ्रेंडशी असलेले 5 वर्षापूर्वीचे नाते संपवले होते. सध्या ती टीवा शो 'डायन' मध्ये दिसत आहे. 

 

ऐश्वर्या रायसोबत काम केले आहे टीनाने.. 
- टीव्ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या टीनाने आपला पहिला डेब्यू 5 वर्षाच्या वयात सीरियल 'सिस्टर निवेदिता' ने केला होता.  
- टीना 16 व्या वर्षी ऐश्वर्या रॉयसोबत बंगाली फिल्म 'चोखेर बाली'(2003) मध्ये दिसली होती. नंतर तिने सैफ अली खान आणि विद्या बालन स्टारर फिल्म 'परिणीता' (2005) मधेही काम केले. टीनाला बंगाली फिल्म 'चिरोडिनी तुमि जे अमार'(2008) मधेही पहिले गेले आहे.