आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता बिझनेस टायकून आणि सुपर पाॅवर असणाऱ्या भूमिकेकडे अभिनेत्रींचा कल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः टीव्ही अभिनेंत्रींची छोट्या पडद्यावरील महिला पात्रांच्या भूमिकेतून स्वत:चे स्थान निश्चित केेले आहे. मग, ती महत्त्वाकांक्षी बिझनेस टायकूनची भूमिका असो वा शक्तीशाली नागिणचे पात्र. महिलांनी पूर्णपणे छोट्या पडद्यावर आपला ताबा मिळवला आहे. या महिला दिनी सुंदर अभिनेंत्रींनी त्या पडद्यावर कोणत्या सशक्त भूमिका साकारू इच्छितात हे शेअर केले. किरण जैनच्या यांच्या माहितीनुसार...

  • अदा खान

टीव्ही मालिकांमध्ये महिला पात्राांमध्येही बदल झाले आहेत. टीव्हीवर महिलांना आता फक्त घरातील चार भिंतीत सीमित ठेवलेले नाही. माझ्या स्वप्नातील भूमिका ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील डेनेरीस टार्गेरियन असेल. स्वत:ला आणि समाजाला महिलांचे महत्त्व पटवून देण्यासाठी महिला दिन हा आणखी एक खास दिवस आहे.

  • रिद्धिमा

महिलांनी नागिन आणि हडळीच्या भूमिकेतूनही सर्वांची मने जिंकली आहेत. टीव्हीच्या तुलनेत महिलांना वेब प्लॅटफॉर्म्सवर आपली प्रतिभा दाखवण्याची जास्त संधी मिळतेय. आता ‘पटियाला बेब्स’ किंवा ‘नाटी पिंकी...’सारखे शो अशा धारणा मोडून काढत आहेत. मला एका संरक्षकाची भूमिका करायची आहे.

  • सीमरन

पूर्वी परफ्युमच्या जाहिरातींमध्ये महिलांना सेक्स ऑब्जेक्ट म्हणून दाखवले जायचे. ते महिलांचा उपयोग त्यांचे उत्पादन विक्री करण्यासाठी करायचे. अलीकडे महिला सशक्तीकरणाच्या कारणामुळे बऱ्याच मालिकांमध्ये महिलांना फक्त सासू-सुनेच्या रूपात दाखवले जात नाही, तर त्यांना स्वतंत्र महिलेच्या रूपात दाखवले जाते.

  • जॅस्मीन

वेगवगळ्या प्रकारच्या मालिका तयार होत आहे. ‘नागिन’ पासून ते बऱ्याच दुसऱ्या मालिका, ज्यात महिला गृहिणी ते व्यावसायिकांचे पात्र साकरत आहेत. मला भविष्यात एका शहरी कथानकातील व्यवसाय टायकूनची भूमिका साकारायची आहे. आपण किती महत्त्वपूर्ण आहोत हे आठवण करून देणारा दिवस म्हणजे महिला दिन होय.

  • दीपना

बऱ्याच टीव्ही मालिकांमध्ये महिला पात्रांचा विकास झाला आहे. मला ‘एफआयआर’ मालिका पाहायला खूप मजा आली होती. ज्यात कविता कौशिकने पोलिसाची भूमिका साकारली होती. मला ‘शरारत’ मालिकाही खूप आवडली. मला अलौकीक शक्ती किंवा सुरपहीरो असणाऱ्या मालिका करायला आवडेल. मला सध्या ‘भाभीजी घर पर हंै’ आवडेतय.  

बातम्या आणखी आहेत...