इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर सध्या तुर्कीच्या एका टीव्ही अँकरचा शॉकिंग व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात लाइव्ह शो सुरू असताना अँकरला अचानक हृदयविकाराचा धक्का बसला. दुसऱ्याच क्षणी तो खुर्चीवरून खाली कोसळला आणि बेशुद्ध पडला. हे सर्व होत असताना त्याच्या बाजूला बसलेल्या गेस्टला नेमके काय सुरू आहे, हे कळलेच नाही. परंतु, अँकर खाली कोसळताच त्याने ताबडतोब आपल्या खुर्चीवर उठून सांभाळण्याचा प्रयत्न केला. संबंधित न्यूज अँकरला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 24 तास अतीदक्षता विभागात ठेवल्यानंतर डॉक्टरांनी तो सुखरूप असल्याचे जाहीर केले. तोपर्यंत त्याचा हा व्हिडिओ विविध प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला.