आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी टीव्ही सेलिब्रिटी झाले सतर्क, मास्क घालून करत आहेत जनजागृती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर पाहता टेलीव्हिजनचे सेलिब्रिटीजदेखील आता सतर्क झाले आहेत. काही सेलिब्रिटी मास्क घालून आपला बचाव करत आहेत तर काही आपल्या फॅन्सला व्हायरसपासून वाचण्याचे सल्ले देत आहेत.  
 
कॉमेडीचा किंग कपिल शर्माने अशातच फ्लाइटमध्ये ट्रॅव्हल केले. आपल्या प्रवासादरम्यानचे काही फोटो कपिलने इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.  कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी कपिल फोटोमध्ये हात दोडून आणि मास्क घातलेला दिसत आहे. या फोटोमध्ये त्याने लिहिले, ‘सावध राहण्यातच सुरक्षा आहे. हस्तांदोलन करण्यास नकार’

  अभिनेता गुरमीत चौधरीने कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी हस्तांदोलन न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत लिहिले, ‘कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहा. प्लीज हैंड शेक करू नका केवळ नमस्ते करा.’

अभिनेता कॉमेडियन अली अजगरने एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला, जो नालीच्या पाण्यात भाज्या धूत आहे. या व्हिडिओसोबत अलीने लिहिले, ‘आपल्याला कोणताही व्हायरस स्पर्श करू शकतो का ? सांगा.’

बातम्या आणखी आहेत...