आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: एमबीए आहे टीव्हीची 'इश्कबाज'बहू, बिझनेसमनला करतेय डेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: 'इश्कबाज' या टीव्ही सीरियलमधून अनिकाची भूमिका साकारणारी सुरभी चांदना 29 (11 सप्टेंबर) वर्षांची झाली आहे. मालिकेत ती ओबेरॉय कुटूंबाच्या सुनेची भूमिका साकारतेय. म्हणजेच ती शिवाय सिंह ओबेरॉय(नकुल मेहता)च्या बायकोच्या भूमिकेत दिसतेय. हे सुरभीचे रील आयुष्य आहे. परंतू ख-या आयुष्यात ती खुप ग्लॅमरस आहे. रियल लाइफमध्ये ती खुप बिंदास आहे आणि सिगारेट ओढते. सुरभी ही कारपोरेट प्रोफेशनल करण शर्माला डेट करतेय. 


मार्केटिंगमध्ये केले आहे एमबीए
तिने आपल्या करिअरच्या सुरुवातीला कमर्शियल जाहिरातींमध्ये काम केले आहे. तिला सर्वांत पहिले 'कुबूल है' मालिकेत काम करण्याची ऑफर मिळाली होती. अनेक लहान-मोठ्या भूमिका करणा-या सुरभीला स्टार प्लसवरील 'इश्कबाज' मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली.
- सुरभी सध्या कारपोरेट प्रोफेशनल करण शर्माला डेट करतेय. तिने करणसोबतचे अनेक फोटोज इंस्टाग्रामवरही शेअर केले आहेत. सुरभी सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह आहे आणि आपले फोटोज नेहमीच पोस्ट करत असते. 
- मुंबईमध्ये जन्मलेली सुरभी पंजाबी कुटूंबातील आहे. तिने मार्केटिंगमध्ये एमबीए केले आहे.

 

जिममध्ये जाणे आवडत नाही 
सुरभीने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मला जिममध्ये जायला अजिबात आवडत नाही. माझी वर्कआउट करण्याची पध्दत एकदम वेगळी आहे. मी डान्स करुन स्वतःला फिट ठेवते. मला जुम्बा डान्स करायला आवडते. जुम्बा एकप्रकारची डान्स बेस्ड एक्सरसाइज आहे. याच्या माध्यमातून मी एका तासात जवळपास 350 कॅलरी बर्न करते.'

 

या मालिकांमध्ये केले आहे काम 
तिने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (2009), 'एक ननद की खुशियों की चाबी.. मेरी भाभी' (2013), 'कुबूल है' (2015), 'आहट' (2015), 'दिल बोले ओबेरॉय' (2017) या मालिकांमध्ये काम केले. ती 2014 मध्ये आलेल्या बॉबी जासूसमध्ये दिसली आहे.

बातम्या आणखी आहेत...