आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 नोव्हेंबरला ऑफ एअर होईल 'कौन बनेगा करोडपती', बिग बींनी सलग 18 तास शूट करून केले रॅप अप 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'कौन बनेगा करोडपाती'च्या 11 व्या सीजनचे शूटिंग संपले आहे. शोचा शेवटचा एपिसोड 23 नोव्हेंबरला टेलीकास्ट होईल. ज्याचे फायनल शूटिंग 13 नोव्हेंबरला अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केले आहे. ज्यासाठी त्यांनी सुमारे 18 तास सलग शूटिंग केले. ज्याबद्दल त्यांनी आपल्या ब्लॉगवरदेखील लिहिले आहे.  


हा आहे अमिताभ यांच्या ब्लॉगमधील काही भाग...  बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये शूटिंगनंतरचे क्षण आणि मनस्थितीची उल्लेख केला आहे. सोबतच त्यांनी संपूर्ण टीमचे आभार मनात लिहिले आहे...  


"जी हां हुज़ूर मैं काम करता हूं; मैं प्रतिदिन काम करता हूं, 
ये काम मैंने कल किया था; ये काम कुछ 18 घंटों का था, 
इस काम ने मुझे आशवासित किया; स्नेह दिया आशीर्वाद दिया,
इस काम ने मुझे रंग रूप दिया; इसे मैंने भी आभार दिया,
क्या रोकोगे इस ओर मुझे; खिलने ना दोगे प्रिये हिए?
छोड़ो, जल सींचो, पुष्प खिले; इक पंख तुम्हें, इक मुझे मिले"

सेटवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी दिले स्टँडिंग ओवेशन... 
शूटिंगच्या शेवटी सेटवर असलेल्या प्रेक्षकांना बिग बींनी अभिवादन केले. यानंतर सर्वांनी त्यांना स्टँडिंग ओवेशनदेखील दिले. यापूर्वी शोचे प्रोड्यूसर सिद्धार्थ बसु यांनीदेखील एक दिवस आधी ट्वीट करून लिहिले होते, '... आणि त्यांच्या आतील सैनिक तयार आहे. एकाग्रतेसोबत, सतत ऊर्जेने भरलेला आणि तेवढ्याच उत्तम स्टाईलमध्ये. कालच्या दिवशीही सलग 12 तासांचे शूटिंग केले आणि याची आजदेखील पुनरावृत्ती होईल.'  

ऑक्टोबरमध्ये डॉक्टर्सने दिला होता ब्रेक घेण्याचा सल्ला... 
अमिताभ बच्चन ऑक्टोबरमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर डॉक्टर्सने त्यांना कामातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ते कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही जाऊ शकले नव्हते. मात्र बिग बींनी सलग शूटिंग करून 3 एपिसोड कम्प्लिट केले आहेत.  

संपूर्ण टीमला म्हणाले धन्यवाद... 
अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केबीसीच्या संपूर्ण टीमला धन्यवाद म्हणाले आहे. त्यांनी लिहिले, 'हसणाऱ्या चेहऱ्यांमध्ये उपस्थित लोकांपैकी एक पुरुष त्या सर्वांचे आभार मानतो. त्या महिलांचेदेखील ज्यांनी शो बनवण्यात मदत केली. ते धमकावतात, ते गाइड करतात, ते हुकूम चालवतात, ते काळजी करतात, ते योग्य करतात, ते शिस्तीचे प्रतीक आहेत, ते आहेत तर आपण आहोत.  


वेळ येते आणि आपल्याला बाहेर करते. अंतिम शब्द.. यासाठी अंतिम संस्कार.. विचित्र पण अजूनही अनोळखी.. उद्यासाठी वेळ आज रिक्त करतो. पुढच्या वर्षाची अपेक्षा करू. त्याच्या पुढेच वर्ष, पुढचे आहे पण जवळ नाही.  

बातम्या आणखी आहेत...