आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शो 'नामकरण' ची अभिनेत्री नलिनीने रूममेटविरुद्ध दाखल केली FIR, जिमला जाताना झाली होती मारहाण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीवी डेस्क : टीव्ही शो 'नामकरण' ची अभिनेत्री नलिनी नेगीने आपल्या रूममेट प्रीती राणा आणि तिची आई स्नेहलता राणा यांच्यावर मारहाणीचा दावा करत ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे. ही घटना 21 ऑगस्टच्या आहे. जेव्हा नलिनीने प्रीतीला सोडण्याचे सांगितले तेव्हा तिचे आईवडील तिच्यासोबत राहण्यासाठी येणार होते.  
 

काही दिवसांसाठी राहू दिले होते... 
नलिनीने सांगितले की, तिने प्रीतीला आपल्या घरी तोपर्यंत राहू दिले होते जोपर्यंत तिला दुसरे घर मिळत नाही. नलिनीनुसार, 'मी तिला हे समजून राहू दिले की, ही काही दिवसांची गोष्ट आहे. माझ्याकडे 2 बीएचके फ्लॅट आहे, त्यामुळे ठीक होते. कारण माझ्या प्रायव्हसीमध्ये काही अडथळे येत नव्हते. पण नंतर मी तिला म्हणाले की, माझे आई वडील माझ्यासोबत राहण्यासाठी येणार आहेत आणि मला एक्स्ट्रा रूम हव्या आहेत. यासाठी प्रीतीही तयार झाली. पण काही दिवसातच तिची आई राहायला आली. त्यावेळी वाटले की, त्या घर शिफ्टिंगसाठी मदत करण्यासाठी आल्या असतील. मागच्या आठवड्यात जेव्हा मी त्यांना जागा रिकामी करायला सांगितले तेव्हा त्या वाद घालू लागल्या. 
 

प्रीतीच्या आईने ग्लास फेकून मारला... 
नलिनीने पुढे सांगितले, “मी एका फ्रेंडसोबत जिमला जाण्यासाठी निघाले होते, तेव्हा तिची वाद घालू लागली आणि मला शिव्या दिल्या. मी त्यांना कारण विचारले तर त्यांनी प्रीतीला फोन केला आणि तक्रार करू लागल्या की, मी त्यांच्याशी गैरवर्तन करत आहे. प्रीती काहीही ऐकून न घेता माझ्यावर ओरडू लागली. मग तिच्या आईने एक ग्लास फेकून माझ्यावर हल्ला केला. दोघी माझ्या चेहऱ्यावर बेदम मारहाण करू लागल्या. त्यांनी मला जवळपास मारूनच टाकले. दोघींना माझा चेहरा खराब करायचा होता. माझी मैत्रीण बाहेर मदतीसाठी आली. प्रकरण वाढते पाहून दोघींनी मला सोडले. जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा, प्रितीने कपडे फाडले आणि पोलिसांना सांगितले की, मी तिला मारहाण करत होते. पण पोलिसांनी माझी अवस्था पाहून दोघींना पकडले. 
 
कोर्टात होईल निर्णय... 
नलिनी म्हणाली, 'प्रीती एक मॉडेल आहे. तिला माहित आहे की, एका कलाकारासाठी त्याचा चेहरा किती महत्वाचा असतो. पण तरीही तिने माझा चेहरा खराब करण्याचा प्रयत्न केला. जर माझी मैत्रीण नसती तर दोघींनी मला मारून टाकले असते. त्यामुळे मी दोघींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आता केस कोर्टात आहे आणि 90 दिवसात सुनावणी होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...