आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • TV Stars Karwa Chauth 2018: Divyanka Tripathi Yuvika Chaudhary And Naagin Actor Arjun Bijlani Wife Keeps Fast On Karwa Chauth

दिव्यांका त्रिपाठीने ठेवला करवा चौथचा उपवास, तर 'सुर्यपुत्र कर्ण' ते 'बनू में तेरी दुल्हन'च्या अभिनेत्रीने केले सेलिब्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'ये है मोहब्बतें' फेम दिव्यांका त्रिपाठीने पती विवेक दहियासोबत करवा चौथचे सेलिब्रेशन केले. दिव्यांका करवा चौथची पूजा करताना दिसली. तर यावेळी विवेक दिव्यांकासोबत रोमँटिक अंदाजात दिसला. दिव्यांकाने स्वतः सांगितले की, तिला भूक सहन होत नव्हती, ती आतुरतेने चंद्राची वाट पाहत होती. साडी नेसून तयार झालेल्या दिव्यांकाने विवेकचे नाव लिहिलेल्या बांगड्या घातल्या होत्या. दिव्यांका आणि विवेकची भेट 'ये है मोहब्बतें'(2013) या मालिकेच्या सेटवर झाली होती. जवळपास एक वर्ष डेटिंग केल्यानंतर दोघांनी 2016 मध्ये भोपाळमध्ये लग्न केले. 


या टीव्ही सेलेब्सनेही सेलिब्रेट केली करवा चौथ 
- 'डोली अरमानों की', 'कुल्फी कुमार बाजेवाला', 'फुलवा' सारख्या मालिकांमध्ये काम केलेल्या मोहित मलिकची पत्नी अदिती सिकरवारनेही (बनू मे तेरी दुल्हनची अभिनेत्री)ने त्याच्यासाठी करवा चौथचा उपवास ठेवला होता.
- 'नागिन'इश्क में मरजावा', 'मिले जब हम तुम' चा अॅक्टर अर्जुन बिजलानीची पत्नी नेहा स्वामीनेही त्याच्यासाठी उपवास ठेवला होता. 
- अभिनेत्री गीता बसराने पती हरभजन सिंहसाठी, युविका चौधरीने पती प्रिंस नरुलासाठी तर पती गौतम रोडसाठी पंखुडी अवस्थीने करवा चौथचा उपवास ठेवला होता. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा करवा चौथ सेलिब्रेशनचे Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...