आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅजेट डेस्क- टीव्हीएस मोटर्सने भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आयक्यूब लॉन्च केली आहे. या स्कूटरची ऑन-रोड प्राइस 1.15 लाख रुपये आहे. याची विक्री सर्वात आधी बंगळुरूमधून केली जाईल. त्यानंतर स्कूटरला देशातील इतर शहरात विक्रीसाठी आणले जाईल. कंपनी सध्या दर महिन्याला गाडीचे 1 हजार यूनिट कयार करत आहे.
स्कूटरच्या लॉन्चिंग इव्हेंटवर टीव्हीएस मोटरचे चेअरमन वेणु श्रीनिवासन म्हणाले की, टीव्हीएस मोटर सर्व इनोवेशन ग्राहकांना समोर ठेवून बनवली आहे. आमचा फोकस देशातील 'ग्रीन आणि कनेक्टेड' यूथवर आहे. आम्ही याला टीव्हीएस इलेक्ट्रिकच्या पोर्टफोलियोमध्ये सामील केले आहे. टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक अॅडव्हांस ड्राइवट्रेन आणि नेक्स्ट जनरेशन टीव्हीएस स्मार्टएक्सकनेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे.
कंपनीने स्कूटरला 2012 ऑटो एक्सपोमध्ये पहिल्यांदा सादर केले होते. यात स्मार्टएक्सकनेक्ट कनेक्टेड टेक, एलईडी डीआरएलसोबतच एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्प दिला आहे. स्कूटरमध्ये दिलेली इलेक्ट्रिक मोटर 6 bhp पॉवर आणि 140 Nm टॉर्क जनरेट करते. तर, याची टॉप स्पीड 78 kmph आहे.
आयक्यूबमध्ये 4.5 kWh ची लिथीयम-ऑयन बॅटरी दिली आहे, जी अंदाजे 5 तासात फूल चार्ज होते. पण, यासाठी अद्याप कंपनीने फास्ट चार्जिंग दिली नाही. भारतीय बाजारात या स्कूटरचासामना बजाज चेतक इलेक्ट्रिक, अथर 450 आणि ओकिनावा प्रेजशी आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.