आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

210 दिवसांत स्कूटरच्या लाखाहून जास्त युनिटची विक्री, नेव्हीगेशन दाखवणारी भारतातील एकमेव, फोन करू शकता कनेक्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅटो डेस्क - TVS ची नवी स्कूटर Ntorq 125 इंडियन यूझरला आवडत आहे. कंपनीने या स्कूटरच्या लाखाहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, 22 लाखांपेक्षा जास्त लोक स्कूटरच्या ऑफिशियल वेबसाइटवर व्हिजिट केली असून त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. TVS ने तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून ही स्कूटर डिझाइन केली आहे. या स्कूटरमध्ये अनेक अॅडव्हान्स फिचर्सही आहेत. या स्कूटरचे स्पीडोमीटर स्मार्टफोनला कनेक्ट करता येते. या स्कूटरची दिल्लीची एक्स-शोरूम प्राइज 59,712 आहे. फेब्रुवारी महिन्यात कंपनीने ती लाँच केली होती. 

 

95kmph टॉप स्पीड
या स्कूटरमध्ये 125cc चे सिंगल-सिलिंडर एअर-कूल्ड पेट्रोल इंजीन दिले आहे. त्याचे मॅक्सिमम पॉवर 9.5bhp आहे. 7,500 rpm आणि 10.5  चे पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने दाला केला आहे की, याची टॉप स्पीड 95kmph आहे. ही स्कूटर 0 ते 9 सेकंदात 60kmph चा वेग पकडते. 


SmartXonnect डिजिटल मीटर
या स्कूटरमध्ये SmartXonnect डिजिटल मीटर आहे. ते 55 प्रकारचे डिटेल देईल. हे मीटर ब्लूटूथ आणि अॅपच्या मदतीने स्मार्टफोनला कनेक्ट करता येते. म्हणजे तुम्हाला स्कूटरशी संबंधित अनेक प्रकारची माहिती फोनवर मिळू शकते. तसेच ते नेव्हीगेशनचे कामही करते. अद्याप इतर कोणत्याही स्कूटरमध्ये हे फिचर आलेले नाही. 


कॉल डिटेल मिळणार
SmartXonnect ला राइडर फोनशी कनेक्ट करू शकतील. त्यानंतर इनकमिंग कॉल अलर्ट, इनकमिंग SMS अलर्ट, मिस्ड कॉल अलर्ट आणि फोन सिग्नल स्ट्रेंथही यावर दिसेल. तसेच स्मार्टफोनच्या बॅटरीची डिटेलही मिळेल. तसेच SMS लाही अॅटो रिप्लाय करेल. असे फिचर फक्त लक्झरी कारमध्येच असते. 


हे फिचर्सही मिळतील 
TVS Ntorq 125 मध्ये LED लाइट आणि टेल लाइटही LED आहे. फ्यूल टँक बाहेरच्या बाजुला आहे. सेफ्टीसाठी फ्रंट टायरला डिस्क ब्रेकही आहे. तसेच अलॉय व्हीलसह ट्युबलेस टायर आहेत. फ्यूल टँक कैपेसिटी 5 लीटर आहे. टेलिस्कोप सस्पेंशनसह ही रेड, यलो, व्हाइट आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध आहे. हे सर्व मेटालिक कलर्स आहेत. 


पुढे पाहा,  TVS Ntorq 125 चे काही PHOTOS.. 

बातम्या आणखी आहेत...