Home | Business | Auto | TVS Ntorq 125 Sales Growth in march 2019

लोकांच्या पसंतीस उतरत आहे NTorq 125, मार्चमध्ये 18 हजार 557 युनिटची झाली विक्री; यामध्ये देण्यात आले कारसारखे डिजिटल मीटर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 22, 2019, 04:31 PM IST

इतकी आहे स्कुटरची टॉप स्पीड, मीटरमध्ये दिसणार ही कामाची माहिती

 • TVS Ntorq 125 Sales Growth in march 2019

  ऑटो डेस्क - TVS मोटार कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 6.6 टक्क्यांनी वाढ दिसून आली. कंपनीच्या या वाढीत एनटॉर्क 125 स्कुटरचे मोठे योगदान आहे. कंपनीने फेब्रवारी 2018 मध्ये या स्कुटरला लॉन्च केले होते. मार्ज महिन्यात कंपनीने या स्कुटरच्या 18,557 युनिट्सची विक्री केली. तर ही स्कुटर टॉप-10 च्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. दूसरीकडे FY2019 मध्ये कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

  95kmph आहे स्कुटरची टॉप स्पीड

  या स्कुटरमध्ये 125ccचे सिंगल-सिलेंडर एअर-कुल्ड पेट्रोल इंजिन दिले आहे. याची कमाल पावर 9.5bhp आहे. हे 7,500 rpm आणि 10.5 Nm पीक टॉर्क जनरेट करतो. या स्कुटरची टॉप स्पीड 95 kmph असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर 0 ते 9 सेकंदात 100kmph चा वेग पकडू शकतो.

  SmartXonnect डिजिटल मीटर

  यामध्ये SmartXonnect डिजिटर मीटर देण्यात आले आहे. हे मीटर 55 प्रकारची माहिती तुम्हाला देईल. याला ब्लूटूथ आणि अॅपच्या मदतीने स्मार्टफोनशी जोडता येते. यामुळे स्कुटरसंबधीशी माहिती तुमच्या फोनवर पाहू शकता. तसेच हे नेव्हिगेशन दाखवण्याचे काम देखील करते. आतापर्यंत इतर कंपन्यांच्या स्कुटरमध्ये याप्रकारचे फीचर देण्यात आलेले नाही.


  फोनवरील कॉलची मिळणार माहिती

  SmartXonnect ला रायडर आपल्या फोनला कनेक्ट करू शकतील. यानंतर इनकमिंग कॉल अलर्ट, इनकमिंग SMS अलर्ट, मिस्ड कॉल अलर्ट आणि फोन सिग्नल स्ट्रेंथ देखील दिसतील. याद्वारे SMS ऑटो रिप्लाय देखील करण्यात येतो. अशाप्रकारचे मीटर अनेक महागड्या आणि लग्झरी कारमध्ये उपलब्ध असते.

  या फीचर्स देखील आहे समावेश

  TVS NTorq 125 मध्ये LED लाइट आणि टेल लाइट देखली LED देण्यात आले आहे. यामध्ये फ्यूल टँक बाहेरच्या बाजूला देण्यात आले आहे. सेफ्टीसाठी फ्रंट टायरमध्ये डिस्क ब्रेक दिला आहे. तसेच अलॉय व्हील्ससोबत ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. या स्कुटरची फ्यूल कॅपेसिटी 5 लीटर आहे.

Trending