BIke launching / टीव्हीएसने सादर केली इथेनॉलवर चालणारी भारताची पहिली मोटारसायकल, किंमत १.२० लाख रुपये

कंपनीने या मोटारसायकलची कॉन्सेप्ट २०१८ मध्ये दिल्ली वाहन प्रदर्शनात दाखवली होती

वृत्तसंस्था

Jul 13,2019 09:11:00 AM IST

नवी दिल्ली - टीव्हीएस मोटारने भारताची पहिली इथेनॉल आधारित मोटारसायकल बुधवारी बाजारात सादर केली. टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० एफआय ई १०० नावाच्या या मोटारसायकलची किंमत १.२० लाख रुपये आहे. या गाडीच्या लाँचिंग प्रसंगी रस्ते वाहतूक तसेच महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत आणि टीव्हीएस मोटारचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन उपस्थित होते. कंपनीने या मोटारसायकलची कॉन्सेप्ट २०१८ मध्ये दिल्ली वाहन प्रदर्शनात दाखवली होती. टीव्हीएस अपाचे टीव्हीएस मोटारचा प्रमुख ब्रँड आहे.

X
COMMENT