आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कंपनीने मोस्ट सेलिंग बाइकचे नवीन व्हेरीएंट केले लाँच, 1 रुपयानेही वाढवली नाही किंमत, मायलेज 95 km चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - TVS ने दिवाळीचे औचित्य साधून TVS स्पोर्ट्सचे नवीन एडिशन लाँच केले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बाइकची किंमत आधी जेवढी होती तेवढीच म्हणजे 40,088  (दिल्ली एक्स-शोरूम ) रुपये ठेवली आहे.

 

हे नवीन मॉडेल किक आणि इलेक्ट्रीक अशा दोन्ही व्हेरीएंटमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही मॉडेलमध्ये अॅलॅाय व्हील्स असतील. या  मॉडेल मध्ये दोन नवीन कलर मिळतील, रेड-सिल्व्हर सोबत ब्लॅक आणि ब्लू-सिल्व्हर सोबत ब्लॅक. या गाडीचे सीटही आधीपेक्षा मोठे करण्यात आले आहे. 


या बाइकला 99.7cc चे 4-स्ट्रोक पेट्रोल इंजीन दिले आहे. 4 स्पीड गीअर बॉक्स  सोबतच, याची पेट्रोल टँकची क्षमता 10 लीटर आहे तर 2 लीटर रिझर्व्ह टँक आहे. कंपनीचा दावा आहे की, ही गाडी 1 लीटर पेट्रोल मध्ये 95 किलोमीटर  चालते.

 
न्यू सेफ्टी फीचर

जुन्या किमतीतच कंपनीने या गाडीत सेन्क्रोनाइज्ज ब्रेकिंग टेक्नोलॉजी (SBT) दिली आहे. हे कॉम्बी ब्रेकपेक्षा अॅडव्हान्स आणि अधिक सुरक्षित आहे. पण डिस्क ब्रेकच्या तुलनेत कमी सुरक्षित आहे. या प्रकारचे सेफ्टी फिचर असलेली ही 100cc ममधली पहिलीच गाडी आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...