आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

86km मायलेजसह या कंपनीने लाँच केली नवी बाइक, किंमत 52907 रुपये; पहिल्यांदाच मिळेल अशी टेक्नोलॉजी दोन्ही ब्रेक एकत्र करतील काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - TVSने इंडियन मार्केटमध्ये आपली मोस्ट पॉप्युलर आणि मायलेज बाइक स्टार सिटीचे नवे मॉडल स्टार सिटी प्लस लाँच केले आहे. या मॉडेलला कंपनीने सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग टेक्नोलॉजी (SBT) सोबत लाँच केले आहे. बाइकमध्ये 110cc चे इंजिन देण्यात आले आहे. एवढ्या cc च्या बाइकमध्ये या प्रकारची टेक्नॉलॉजी देणारी TVS भारतातील पहिली कंपनीही बनली आहे. बाइकची दिल्ली एक्स-शोरूम प्राइस 52,907 रुपये आहे. 


काय आहे सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग टेक्नोलॉजी?

सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग टेक्नोलॉजी (SBT) मध्ये दोन्ही ब्रेक एकत्र काम करतात. म्हणजेच बाइकच्या स्पीड कंट्रोलसाठी जेव्हा ब्रेक लावले जातात तेव्हा फ्रंट आणि रिअर ब्रेक एकत्र अॅक्टिव्ह होतात. ही टेक्नोलॉजी फ्रंट किंवा रिअर कोणत्याही प्रकारचे ब्रेक लावण्यासाठी काम करते.

 

दमदार मायलेज
बाइकमध्ये 109.7CC चे इंजिन देण्यात आले आहे. त्याची मॅक्सिमम पॉवर 8.28 bhp @ 7000 rpm आहे. कंपनीचा दावा आहे की, याचे मायलेज 86 Kmpl आहे. यात 4 स्पीड-गिअर बॉक्स देण्यात आला आहे. दुसरीकडे, फ्यूएल टँक 10 लीटरचे आहे. यात रिझर्व्ह पेट्रोल 2 लीटर आहे. बाइकची टॉप स्पीड 90Kmph आहे. दुसरीकडे, 0 ते 60 kmphची स्पीड फक्त  7.7 सेकंदांत पकडते. कंपनीने ही ग्रे-ब्लॅक, ब्लॅक-रेड, ब्लॅक-ब्लू आणि रेड-ब्लॅकच्या ड्युएल कलर कॉम्बिनेशनमध्ये लाँच केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...