आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tweet Tweeted By Actor Prakash Raj On Gandhi's Birthday, Saying 'Jai Sri Ram's Violence'

गांधी जयंतीनिमित्त अभिनेता प्रकाश राजने केले असे ट्विट, म्हणाला - 'जय श्री रामची हिंसा'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज आपल्या अभिनयासाठी खूप प्रसिद्ध आहे, पण अशातच प्रकाश राज आपल्या एका ट्वीटमुळे चर्चेत आला आहे. या ट्वीटमध्ये अभिनेत्याने महात्मा गांधी यांची 150 वी जयंतीला देशातील नागरिकांना एक प्रश्न केला आहे. सलमान खानसोबत चित्रपट 'वॉन्टेड' मध्ये जबरदस्त भूमिका साकारणारा अभिनेता प्रकाश राजने गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले, '#गांधी जयंती, प्रिय नागरिकांनो... या दिवशी आपण 'जय श्री राम ची हिंसा आणि हे राम च्या अहिंसे' वर विचार करू शकतो.'


प्रकाश राजच्या या ट्वीटवर लोक खूप प्रतिक्रिया देत आहेत. बॉलिवूड आणि साउथ अभिनेता प्रकाश राजने यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावले होते. मात्र निवडणुकीत तो जिंकू शकला नाही. अभिनेता आपल्या ट्वीटसाठी खूप प्रसिद्ध आहे.