आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Twelve year old Girl Can Reads Book After Even Eyes Are Packed With Handkerchief; Identifies The Colour Of The Handkerchief And The Number On The Notes

डाेळ्यांवर पट्टी बांधल्यानंतरही बारा वर्षांची मुलगी वाचते पुस्तक; ओळखते रुमालाचा रंग आणि नोटांवरील क्रमांक

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नांदेड : मुखेड शहरातील एक बारा वर्षाची बालिका पुस्तकाचे वाचन मन:चक्षूने करते असे सांगितले तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे. नंदिनी एकाळे असे या बालिकेचे नाव आहे.

मुखेड शहरातील मेडिकल व्यवसायात असलेले संतोष एकाळे यांची मुलगी नंदिनी सध्या मुखेड तालुक्यातील सलगरा येथील इंदिरा गांधी विद्यालयात ६ व्या वर्गात शिक्षण घेत आहे. डोळ्यांवर पट्टी बांधून ती चक्क नोट व नोटांवरील नंबर ओळखणे, वस्तू ओळखणे, रुमालाचा रंग ओळखणे, पुस्तकावरील अक्षर ओळखणे, आय.डी. कार्ड ओळखणे व त्याच्यावरील नाव ओळखणे अशा विविध प्रकारच्या अकरा बाबी ती सहज ओळखू शकते.

डोळे बंद असताना ओळखते कसे या विषयी नंदिनीला विचारले असता नंदिनी म्हणते, मी डोळे मिटल्यानंतर माझ्या हातातील चित्र माझ्या बुद्धीमध्ये तयार होते व कल्पना शक्तीच्या जोरावर मी डोळ्यांवर पट्टी बांधून सुध्दा नोटेवरील नंबर असो अथवा पुस्तकावरील लिखाण सहज ओळखू शकते.

ही जादू नाही, कला आहे : नंदिनीच्या वडिलांकडून या कलेविषयी माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, हैदराबाद येथे माझे मित्र लक्ष्मण राठोड आहेत. त्यांना माझ्या मुलीच्या गुणवत्तेविषयी सांगितले असता त्यांनी ही कला माझ्या मुलीला शिकवली. ही कला ६ ते १२ वयोगटातील मुलींनाच शिकवता येते. अनेकांना शिकवूनही ती त्यांना अवगत होत नाही. पण नंदिनीने ही कला केवळ तीन आठवड्यांत अवगत केली. यामुळे तिच्या अभ्यासावर जास्त लक्ष देण्याची गरज राहिली नाही. एक वेळेस पाठांतर केले असता तिला सहज लक्षात राहत आहे. यामुळे तिच्या गुणवत्तेवर याचा मोठा परिणाम दिसू लागला आहे, असे ते म्हणाले. नंदिनीच्या या गुणामुळे तिचे तालुक्यातील अनेक शाळांमध्ये कार्यक्रम होत असून तिच्या गुणवत्तेमुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.