आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० पात्रता स्पर्धा आजपासून, १४ संघांत ५१ सामने विजेत्या सहा संघांना विश्वचषक प्रवेश निश्चितीची संधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धा १८ ऑक्टोबरपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. स्पर्धेत १४ संघांचा समावेश असेल. २ नोव्हेंबरपर्यंतच चालणाऱ्या स्पर्धेत ५१ सामने खेळवले जातील. त्यानंतर अव्वल सहा संघांना विश्वचषकाचे तिकीट मिळले. विश्वचषकाचे सामने पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान होतील. यात एकूण १६ संघ खेळणार आहेत. १० संघांना विश्वचषकात थेट प्रवेश मिळाला आहे. आयसीसीच्या नियमानुसार ऑस्ट्रेलियाला यजमान असल्याने विश्वचषकात थेट प्रवेश आहे. त्यासह ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत क्रमवारीतील ९ संघांना विश्वचषकात थेट संधी देण्यात आली. क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा समावेश करण्यात आला नाही. त्याच्यासह पाकिस्तान, भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, श्रीलंका व बांगलादेश यांचा समावेश आहे. आतापर्यंत सहा वेळा टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्या आहेत. वेस्ट इंडीज (२०१२, २०१६) संघाने सर्वाधिक दोन वेळा हा किताब जिंकला. भारत (२००७), पाकिस्तान (२००९), इंग्लंड (२०१०) आणि श्रीलंका (२०१४)मध्ये विजेता ठरला. वनडे विश्वचषकचा किताब पाच वेळा जिंकलेली ऑस्ट्रेलियन टीम कधीही टी-२० किताब जिंकू शकला नाही. टीमने २०१० मध्ये फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता तेव्हा इंग्लंडने त्यांना ७ गड्यांनी पराभूत केले होते. त्याशिवाय संघ कधीही फायनलमध्ये पोहोचला नाही.
 

आफ्रिका खंडाचे सर्वाधिक तीन संघ आता पात्रता फेरीत खेळणार
आयसीसीने पात्रतापूर्वी विभागानुसार स्पर्धा घेतली. यात आठ संघ पात्रता फेरीत उतरतील. सर्वाधिक तीन संघ आफ्रिका खंडातील नामिबिया, केनिया व नायझेरिया हे संघ असतील. अमेरिकेमधून कॅनडा व बर्म्युडाला संधी मिळाली. पूर्व आशिया पॅसिफिकमधून पापुआ न्यू गिनिया, युरोपमधून जर्सी व आशियामधून सिंगापूरला तिकीट मिळाले. यूएईला पात्रता फेरीचे यजमान असल्याने खेळण्याची संधी मिळाली. दुसरीकडे गेल्या विश्वचषकात खेळणारे पाच संघ स्कॉटलंड, हॉलंड, हाँगकाँग ओमान व आयर्लंडदेखील क्रमवारीच्या आधारे स्पर्धेत खेळतील.
 

प्रत्येक गटात ६ साखळी सामने  
१४ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली. म्हणजे प्रत्येक गटात ७ संघ असतील. प्रत्येक संघाला गटात ६ सामने खेळावे लागतील. दोन्ही गटांतील अव्वल टीम विश्वचषकासाठी पात्रता मिळवेल. त्यानंतर दोन्ही गटांतील दुसऱ्या ते चौथ्या क्रमावरील संघांत प्लेऑफचे सामने खेळवले जातील. ज्यातून चार संघ विश्वचषकात प्रवेश करतील.

संघ पुढीलप्रमाणे :
> अ गट : स्कॉटलंड, हॉलंड, पापुआ न्यू गिनिया, नामिबिया, सिंगापूर, केनिया, बर्म्युडा.
> ब गट : यूएई, आयर्लंड, ओमान, हाँगकाँग, कॅनडा, जर्सी, नायझेरिया.
 

पहिल्या दिवशी खेळवण्यात येणारे सामने :
> अ गटात : स्कॉटलंड विरुद्ध सिंगापूर, केनिया विरुद्ध हाँलंड.
> ब गटात : हाँगकाँग विरुद्ध आयर्लंड, यूएई विरुद्ध ओमान.