आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या करण्यापूर्वी आरोपींनी 3 वेळस पाहिली ही बॉलीवूड फिल्म, नंतर बनवला काँग्रेस नेत्या ट्विंकल डागरेचा मर्डर प्लॅन, पूर्ण फॅमिलीने पाठ केली होती स्क्रिप्ट...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर- कांग्रेस नेत्या ट्विंकल डागरे यांच्या हत्येचे आरोपी भाजप नेता आणि माजी नगरसेवक जगदीश करोतिया आणि त्याचा मुलगा अजय (माजी एल्डरमॅन), विजय, विनय आणि साथी नीलू उर्फ नीलेश कश्यप यांना शनिवारी पोलिसांनी न्यायालयात सादर केले. कोर्टाने जगदीशची 14 आणि इतर चार आरोपींची 16 जानेवारीपर्यंत पोलिस सिमांड मंजुर केली आहे. आरोपींनी कबुल केले की, ट्विंकलची हत्या करण्यापूर्वी चार पाच दिवसांपासून तिच्या हत्येची प्लॅनिंग सुरू होती. हत्येसाठी चांगला प्लॅन आखता यावा म्हणून तीन वेळेस 'दृश्यम' सिनेमा पाहिला. किडनॅप केल्यानंतर तिला घरी घेऊन गेलोत आणि तिथे अजय आणि जगदीशने तिला मारहाण केली. त्यानंतर चारही आरोपींनी तिला नीलुच्या शेतात नेले आणि दोरीने तिचा गळा आवळल्यानंतर तिला जाळून टाकले.


पोलिसांकडे आरोपींचा ड्रायव्हर आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आधिकाऱ्यांनी सांगितले, आरोपींना शिक्षा देण्यासाठी सगळे पुरावे मिळाले आहेत त्यात ट्विंकलचे कानातले, दोरीचा तुकडा आणि जळालेल्या मृतदेहातून निघालेला कपडा.


कुटुंबाच्या अब्रुचा प्रश्न 
ट्विंकलचे जगदीशसोबत संबंध होते. तिने हातावर जगदिशचे नाव गोंदले होते, आणि तिला त्याच्यासोबत लग्न करायचे होते. जगदीश तयार नाही झाला तर तिने अजयसोबत प्रेम संबंध बनवले आणि लग्न केले. कुटुंबाच्या अब्रुमुळे जगदीशने नकार दिला, पण तिने ऐकले नाही म्हणून तिला मारून टाकले.


कुत्र्याला मारून दिशाभुल केली 
सिनेमाप्रमाणेच करोतिया परिवाराने स्वत:ला वाचवण्यासाठी एका कुत्र्याला मारून टिगरिया बादशाह परिसरात गाढले. त्यानंतर आपल्या माणसांकडून पोलिसांना आणि तिच्या कुटुंबीयांना बातमी दिली की, ट्विकंकला कतोरीयाच्या लोकांनी मारले. पोलिसांनी त्या जागेवर जाऊन खोदले तर त्यांना कुत्रा मिळाला.


फोन फेकून लोकेशन दुसरे दाखवले 
सिनेमाप्रमाणेच जगदीशने ट्विंकलचा मोबाईल मुलांना दिला, त्याला त्यांनी बदनावरला फेकून दिले. ट्विंकलचे कुटुंबीयांनी बदनावरमधल्या अमित नावाच्या युवकासोबत ठरवले होते. 19 ऑक्टोबरला मोबाईलची लोकेशन बदनावरला मिळाल्यामुले पोलिसांनी अमितला चौकशीसाठी बोलवले, पण त्यात काही मिळाले नाही.


तक्रारदारावरच आरोप
आरोपी जगदीशने ट्विंकलच्या वडिलांविरूद्धच तक्रार दाखल केली. पोलिसांचा संशय मुलीच्या कुटुबींयांकडेच जात होता. पण शेवटी पोलिसांनी सर्व धागे दोरे शोधले आणि आरोपींना पकडले.
 

बातम्या आणखी आहेत...