आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Twinkle Helps Akshay For Choosing Films, Akshay Said, Her Advice Is Very Important Factor Of My Successful Carrier

चित्रपट निवडण्यासाठी अक्षयची मदत करते ट्विंकल, म्हणाला - 'यशस्वी करियरमध्ये पत्नीचा सल्ला आहे महत्वाचा' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमार सलग उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. चांगल्या चित्रपटांमुळे त्याच्या मार्केट व्हॅल्यू खूप फायदा झाला आहे. याचा परिणाम आहे की, त्याचे नाव फोर्ब्स लिस्ट 2019 मध्ये सर्वात श्रीमंत स्टार्समध्ये सामील झाले आहे. 15 ऑगस्टला त्याचा चित्रपट 'मिशन मंगल' रिलीज होणार आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. अभिनेता आपल्या यशस्वी करियरचे श्रेय पत्नी ट्विंकल खन्नाला देतो.  

 

उत्तम गाईडन्स देते ट्विंकल - अक्षय... 
पत्नीसोबतच्या आपल्या बॉन्डिंगबद्दल अक्षयने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले, 'ट्विंकल पत्नीबरोबरच माझी खूप चांगली मैत्रीणही आहे. ती मला अनेक गोष्टींबद्दल सल्ला देते. मात्र मी तिच्याशी माझ्या कामाच्या बाबतीत जास्त चर्चा करत नाही. पण जेव्हा वाटते की, मला तिच्या सल्ल्याची गरज आहे तेव्हा तिच्याशी चित्रपट आणि कामाबद्दल चर्चा करतो. ती माझे बोलणे शांततेने ऐकून घेते आणि मला उत्तम गाईडन्स देते.'

 

अक्षयने पुढे सांगितले, 'माझे करियर उत्तम घडवण्यात ट्विंकलची खूप महत्वाची भूमिका राहिली आहे. मी तिच्याशी प्रत्येक स्क्रिप्टबद्दल बोलत नाही. पण तरीही ती माझ्याशी बोलते आणि मी तिचे बोलणे लक्षात ठेवतो. ती एकदा मला म्हणाली होती, काही जोर जबरदस्ती नाहीये, जे चांगले वाटते ते कर.' 

 

सतत चित्रपट, शूटिंग आणि प्रमोशन आहे व्यस्त... 
अक्षय आपला चित्रपट 'मिशन मंगल' च्या प्रमोशनला सज्ज झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जॉन इब्राहिमचा चित्रपट 'बाटला हाउस' सोबत या चित्रपटाची टक्कर होणार आहे. त्यानंतर सलग अक्षय चित्रपटात व्यस्त आहे. तो रोहित शेट्टीचा चित्रपट 'सूर्यवंशी' सोबतच 'लक्ष्मी बॉम्ब', 'हाउसफुल 4' मध्येही दिसणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...