आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Twinkle Khanna Angry About Student Being Beaten In JNU, Wrote 'This Is A Country That Refuses To Live In Fear'

विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे भडकली ट्विंकल खन्ना, लिहिले - 'हा तो देश आहे ज्याने घाबरून जगण्यास नकार दिला आहे'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रविवारी जेएनयूमध्ये फीस वाढीविरुद्ध प्रदर्शनदरम्यान हिंसाचार झाला. चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या काही जणांनी प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना काठ्या आणि लोखंडाच्या रॉडने बेदम मारहाण केली. त्यांनी सुमारे तीन कॅम्पसमध्ये गोंधळ घातला. हल्ल्यामध्ये अध्यक्ष आयशी घोषसह अनेक जण जखमी झाले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी स्वत:च एफआयआर दाखल केली. या घटनेमुळे बॉलीवुड सेलेब्सने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि आपला राग व्यक्त केला आहे. ट्विंकल खन्नापासून ते तापसी पन्नू, स्वरा भास्कर, शबाना आजमी, अनुराग कश्यप, नेहा धूपिया, रितेश देशमुखसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला. 


ट्विंकल खन्नाने लिहिले, "भारत, जिथे गायींना विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सुरक्षा मिळते. हा तो देश आहे, ज्याने घाबरून जगण्याला नकार दिला आहे. तुम्ही हिंसाचार करून लोकांचा आवाज दाबू शकत नाही....आणखी जास्त विरोध होईल, प्रदर्शन जास्त होईल, रस्त्यावर जास्त लोक उतरतील.' 

स्वरा भास्करची आई जेएनयूमध्ये प्रोफेसर आहे. तिने आईचा मॅसेज शेअर करून लिहिले, 'माझ्या आईकडून, SMS द्वारे, नॉर्थ गेटच्या बाहेर गर्दी घॊशन देत आहे की, 'देशाच्या गद्दरांना गोळी मारा सर्वांना.' एवढेच नाही, स्वराने राहुल गांधीच्या ट्वीटवर देखील रिप्लाय करून त्याला जेएनयूमध्ये जाण्याचे अपील केले होते, जेणेकरून त्याच्या प्रेशरमुळे तेथील परिस्थिती सुधारू शकेल. स्वरा भास्करने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अपील केली आहे. 

रेणुका शहाणेने लिहिले, "पूर्णपणे कायद्याच्या विरुद्ध, चेहरा झाकलेले गुंड जेएनयू (JNU) मध्ये कसे शिरू शकतात आणि शिक्षकांना कसे घाबरवू शकतात. दिल्ली पोलिस काय करत आहे, केवळ निशस्त्र लोकांवर वर ककर्ता येतात का ? जे सरळसरळ कायद्याचे उल्लंघन करत आहेत त्यांना मुक्त सोडले आहे का ? अविश्वसनीय, भयंकर, लाजिरवाणे"

शबाना आजमीने लिहिले, 'खरच असे होत आहे ? मी भारतात नाहीये आणि हे सर्व एखाद्या वाईट स्वप्नसारखे वाटत आहे. जेएनयूमध्ये हिंसाचार भडकल्यामुळे 20 विद्यार्थ्यांना एम्समध्ये दाखल केले गेले.'

अनुराग कश्यपने लिहिले, 'आपण आता केवळ गप्प बसून हे पाहू शकत नाही.' आणखी एका ट्वीटमध्ये त्याने लिहिले, 'हिंदुत्व दहशतवाद आता पूर्णपणे वाढला झाला आहे.' 

विशाल भारद्वाजने लिहिले, 'है दस्तूर की सुबह होने से पहले, रातों का गहरा हो जाना लाजिम है, जुल्म बढ़ाओ अभी तुम्हारे जुल्मों का, हद से बाहर भी हो जाना लाजिम है. हे पाहणे लाजिरवाणे आहे जे जेएनयूमध्ये होते आहे.'