आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयकुमारला लग्नासाठी होकार देण्याअगोदर ट्विंकल खन्नाने बनवले होते दोन चार्ट, लग्न मुलांसाठी केले जाते, त्यासाठीच चेक केला होता अक्षयच्या कुटुंबाचा हेल्थ रेकॉर्ड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचे लग्न 17 जानेवारी 2001 ला झाले होते. पण तुम्हाला माहित आहे का की, अक्षयसोबत करण्याअगोदर ट्विंकलने खूप पेपर वर्क केले होते. ट्विंकलने अक्षयला सहज होकार नाही दिला, तर त्यासाठी दोन चार्ट तयार केले होते. ज्यातील एक अक्षयची हेल्दी जींस, फॅमिली बॅकग्राउंडसाठी होता आणि दुसरा लग्नाचे फायदे आणि नुकसान यासाठी होता. ट्विंकलने स्वतः याबद्दल 2016 मध्ये 'कॉफी विद करन'च्या एका एपिसोडमध्ये सांगितले होते. तेव्हा, अक्षयनेही स्वीकार केर्ले होते की, जेव्हा लग्नानंतर ट्विंकलने त्याला या चार्ट्सबद्दल सांगितले तेव्हा तो खूप चिडला होता.  

 

ट्विंकलने तपासले होते अक्षयचे फॅमिली रेकॉर्ड...
लग्नापूर्वी अक्षयचे फॅमिली रेकॉर्ड तपासून काढल्याचे ट्विंकलने या शोमध्ये सांगितले. अक्षयच्या फॅमिलीत कुणाला काही आजार तर नाही ना? त्याच्या फॅमिलीत कुणाचे टक्कल तर पडले नाही ना? एखाद्या आजाराने कुणाचा मृत्यू तर झाला नाही ना? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ट्विंकलने अक्षयच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. यावर अक्षय म्हणाला, "लग्नानंतर मला याविषयी समजले होते. त्यावेळी मला ट्विंकलचा खूप राग आला होता. मात्र आता वाटतं, की कुंडली मिळवण्याऐवजी या गोष्टी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

 

ट्विंकलची आई अक्षयला संजयची 'गे'... 
शोमध्ये ट्विंकलने तिच्या लग्नाबद्दल सर्वात मोठा खुलासा केला की डिंपल कापडीया अक्षयला 'गे' समजत असे. डिंपल यांना त्यांच्या एका जर्नलिस्ट फ्रेंडने सांगितले की अक्षय 'गे' आहे. यानंतर डिंपल यांनी अक्षयची माहिती काढली. इतकेच नाही तर अक्षयचे जेनेटिक चेकही केले.
शोमध्ये ट्विंकलने सांगितले की, अक्षयने लग्नासाठी प्रपोज केले त्यावेळी तिचा मेला हा चित्रपट रिलीज होणार होता. जर मेला फ्लॉप झाला तर लग्न करेल असे ट्विंकलने ठरवले होते. चित्रपट फ्लॉप झाल्यावर अक्षय ट्विंकलच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी गेला.

 

ट्विंकलने 15 दिवसांसाठीच बनवले होते अक्षयला बॉयफ्रेंड... 
ट्विंकलने सांगितले, की तिने फक्त 15 दिवसांसाठी अक्षयला तिचा बॉयफ्रेंड बनवले होते. त्याचकाळात ट्विंकल एका रिलेशनशिपमधून बाहेर पडली होती आणि काही दिवस सिंगल स्टेटस तिला एन्जॉय करायचा होता. त्याकाळात अक्षय कुमार  कॅलिगरी येथे एका सिनेमाचे शूटिंग करत होता. त्याचे शूटिंग शेड्युल 15 दिवसांचे होते.  ट्विंकलने सांगितले, की तेव्हा तिच्याजवळची सर्व पुस्तके वाचून झाली होती आणि तिथे टीव्हीदेखील नव्हता. त्यामुळे शूटिंगनतर अक्षयसोबत वेळ घालवण्याचे तिने ठरवले. येथून दोघांचे नाते पुढे गेले.  

 

रोज रात्री रमी खेळतात ट्विंकल-अक्षय...
करणच्या शोमध्ये ट्विंकलने खुलासा केला, की ती रोज रात्री अक्षयसोबत रमी खेळते आणि आत्तापर्यंत या खेळात ती साडे चार लाख रुपये हरली आहे. मात्र अद्याप तिने अक्षयला यापैकी एकही रुपया दिला नसल्याचेही तिने हसून सांगितले.  

 

बर्थडेला अक्षयने टि्ंविकलला दिले होते हे गिफ्ट...
याविषयी ट्विंकलने सांगितले होते की, आम्ही दोघे एकमेकांना डेट करत असताना अक्षयने माझ्या बर्थडेला क्रिस्टलचे पेपरवेट गिफ्ट केले होते. तेव्हा ट्विंकल म्हणाली होती, की एक दिवस या पेपरवेटच्या वजनाचा हीरा द्यावा लागेल.


अक्षयमुळे ट्विंकलसाठी निघाले होते अरेस्ट वॉरंट.. 
एका फॅशन शोमध्ये ट्विंकलने अक्षय कुमारच्या जींसची बटण उघडली होती. त्यावर ट्विंकलने सांगितले, की तिने हे सर्व अक्षयच्या म्हणण्यावरुन केले होते. या घटनेतून  अक्षय तर  फ्री झाला होता. मात्र ट्विंकलच्या नावाने अरेस्ट वॉरंट निघाले होते.

बातम्या आणखी आहेत...