आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या वाईट काळात त्याला मदत करतेय अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: कॉमेडी किंग कपिल शर्मा दिर्घकाळापासून आयुष्यातील वाईट काळाशी सामना करतोय. कपिल ब-याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. तो शेवटच्या वेळी स्वतःचाच कॉमेडी गेम शो 'फॅमेली टाइम विद कपिल' होस्ट करताना दिसला होता. हा शो सुरु होताच बंद झाला होता. यामुळे त्याच्या आयुष्यात अनेक कॉन्ट्रोवर्सीज सुरु होत्या. यामुळे तो खुप टेंशनमध्ये होता. त्याला ड्रिंक करण्याची सवय लागली होती. यामुळे त्याचे वजन खुप वाढले. अशात त्याची मदत करण्यासाठी बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री समोर आली आहे. तिने कपिलला स्वतःवर उपचार घेण्यास सांगितले. तिचे ऐकूण कपिल पुन्हा स्वतःवर उपचार घेत आहे. 

 

कपिल या वादांमध्ये अडकला होता 
ज्यावेळी कपिल शर्माचा को-स्टार सुनील ग्रोव्हरसोबत त्याचे भांडण झाले तेव्हा तो पहिल्यांदा वादात अडकला. दोघांमध्ये बरेच भांडण झाले होते. यानंतर एका पत्रकाराला शिवीगाळ केल्यामुळे तो वादात अडकला होता. यानंतर अनेक वादांत तो अडकत गेला. नंतर त्याने टीव्हीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आता वृत्त आहे की, तो पुन्हा टेलीव्हिजनवर परणार आहे. अशा वेळी कपिल आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल करतोय. यामुळे तो आपले वजन कमी करण्यास खुप मेहनत घेत आहे. 

 

कपिलने ट्विंकल खन्नाचे हे ऐकले 
ड्रिंकची सवय दूर करण्यासाठी कपिल बेंगलुरुच्या एका आयुर्वेदिक आश्रममध्ये उपचार घेत आहे. कपिल तेथे डेटॉक्सिफिकेशन प्रोग्राम अटेंड करतोय. तसेच तो यासोबतच योगा आणि मेडीटेशनही करतोय. त्याला 15 किलो वजन कमी करण्यास सांगण्यात आले आहे. कपिल आता ड्रिंकपासून दूर आहे अशाही चर्चा आहेत. तो या आश्रमात ट्विंकल खन्नाचे नुकतेच लॉन्च झालेले Pyjamas Are Forgiving हे पुस्तक वाचत आहे. कपिलच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, कपिल यापुर्वीही या आश्रमात गेला होता. परंतू तेव्हा तो हा कोर्स मध्येच सोडून गेला होता आणि ड्रिंक करणे सुरु केले होते. परंतु यावेळी तसे नाही. तो खुप घाम घालतोय. कपिल म्हणतो की, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने त्याला ट्रिटमेंट घेण्यास सांगितली. कपिलने ट्विंकलचे ऐकले आणि स्वतःवर उपचार करुन घेत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...