आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विंकलने उडवली नरेंद्र मोदींच्या गुहेतील साधनेची टिंगल, ट्विटरवर शेअर केला ध्यानमुद्रेचा फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - ट्विंकल खन्नाला समय सुचकता आणि स्पष्टव्यक्ती विचारांसाठी ओळखल्या जाते. पीएम नरेंद्र मोदींबाबतही जी काही मते असतील ती स्पष्टपणे मांडते. ट्विंकलने पु्न्हा एकदा मोदींची टिंगल करत आपल्या ट्विटर हँडलवर ध्यानमुद्राचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिलेल्या एका नोटवरून ती मोदींनी केदारनाथ यात्रेदरम्यना केलेल्या दोन दिवसीय साधनेवर निशाणा साधत आहे. 

 

ट्विंकलने फोटोसोबत लिहिली पोस्ट
ट्विंकलने फोटो शेअर करत लिहिले की,'गेल्या काही दिवसांपासून अध्यात्मिक फोटो पाहिल्यानंतर मी आता मेडिटेशन फोटोग्राफी-पोजेस आणि अँगल्स वर कार्याशाळा सुरू करणार आहे. मला असे वाटते की, वेडिंग फोटोग्राफी नंतर ही मोठी फोटोग्राफी होत चालली आहे.'

 

लोकांनी ट्विंकलला केले ट्रोल

ट्विंकलच्या पोस्टवर लोकांनी कमेंट केल्या आहेत. तिने अशाप्रकारची खिल्ली उडावयला नको होती असे अनेक युझर्सने लिहिले आहे. तर एका युझरने अक्षय कुमारला टॅग करत लिहिले की 'तुम्ही आम्हाला चांगले वाटतात. पण कधी-कधी तुमची पत्नी खूप इरिटेट करते.' दुसऱ्या एका युझरने अक्षय कुमारलाच टॅग करत लिहिले की, 'आता तुमच्या घरात शांतता नांदेल.'

 

 

मोदींनी देखील ट्विंकलची केली होती मस्करी

काही दिवसांपूर्वी अक्षयने पीएम मोदींची मुलाखत घेतली होती. यादरम्यान पीएम मोदी त्याला म्हणाले होते की, 'मी सोशल मीडिया पाहत असतो. यामुळे बाहेरच्या विश्वात काय चाललंय याची माहिती मिळते. मी तुमचे आणि ट्विंकल खन्नाचे ट्वीवटर पाहत असतो आणि ज्याप्रकारे ती माझ्यावर रोष व्यक्त करतात यामुळे तुमच्या घरात खूपच शांतता नांदत असेल.'

 

  

 

बातम्या आणखी आहेत...