प्रवासादरम्यान प्रसूती वेदना..जुळ्यांचा / प्रवासादरम्यान प्रसूती वेदना..जुळ्यांचा झाला जन्म, एकाचा लोकलमध्ये तर दुसर्‍याचा स्टेशनवर

दिव्य मराठी वेब टीम

Jan 02,2019 10:24:00 AM IST
मुंबई- पालघर रेल्वेस्थानकात एका गर्भवती महिलेने मंगळवारी जुळ्यांना जन्म दिला. छाया सवरा असे महिलेचे नाव आहे. छाया ही पती आणि सासूसोबत डहाणू येथे लोकलने जात होती. याच वेळी तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे तिला तातडीने पालघर रेल्वेस्थानकातील एका कक्षात नेण्यात आले. काही वेळातच स्थानकात डॉ. राजेंद्र चव्हाण पाचारण करण्यात आले. दहा मिनिटांनंतर महिलेने जुळ्यांना जन्म दिला. यात एक मुलगी आणि मुलाचा समावेश आहे. दरम्यान, आई आणि बाळांची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

X
COMMENT