आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायजेरियातील इग्बो-ओरामध्ये जुळ्यांचा उत्सव, सर्वाधिक जुळे याच गावात होत असल्याचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इग्बो-ओरा - नायजेरियातील इग्बो-ओरा शहर.जगभरात जुळ्यांची राजधानी म्हणून याची ओळख आहे. यामुळे येथे जुळ्या मुलांचा जन्मोत्सव साजरा करतात. हे फेस्टिव्हल शुक्रवारपासून सुरू झाला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक येत आहेत. या फेस्टिव्हलमध्ये लहान मुलांपासून लहान-मोठे नागरिक या जुळ्यांना पाहण्यासाठी येत आहेत.  इग्बो-ओरामध्ये जगात सर्वाधिक प्रमाणात येथेच जुळ्यांचा जन्म होताे. नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्सनुसार, अमेरिकेत दर हजारी ३३ जुळे इतके प्रमाण आहे. तर  इग्बो-ओरामध्ये हेच प्रमाण सरासरी ५० जुळे असे  आहे. स्थानिक लोकांनी म्हटले, वसाहती होण्याच्या अाधीच्या काळात जुळ्यांचा जन्म नेहमी अशुभ मानला जात होता. परंतु आज त्यांना आशीर्वाद मानले जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते, आजवर इग्बो-ओरामध्ये जुळ्यांचे प्रमाण जास्त का असते, हे एक कोडे आहे. 
 

लोकांचे म्हणणे, महिलांच्या आहारामुळे जुळ्यांचा जन्म हाेतो
स्थानिक लोकांच्या मते, स्थानिक महिलांच्या आहारामुळे येथे जुळ्यांचा जन्म होण्याचा प्रमाण अधिक आहे. स्थानिक नेते सॅम्युअल अदेयुवी अडेले यांनी म्हटले, येथील लोक बेलाची पाने, भेंडीची पाने व आवळा मोठ्या प्रमाणावर सेवन करतात. बेलाच्या पानात गॉनेडोट्रॉपिन नावाचा रासायनिक पदार्थ असतो. त्यामुळे महिलाच्या गर्भात अनेक अंडी तयार होतात. फर्टिलिटी तज्ञांच्या मते तसे वाटत नाही. अनुवांशिक कारण असावे, असे त्यांना वाटते. 
 
 

बातम्या आणखी आहेत...