आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजबच....जुळे बहिण-भावाप्रमाणे हे आहेत जुळे पती-पत्नी, लोकही झालेत हैराण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रशिया : निसर्गाने अशा काही गोष्टी निर्मिती केली आहे की, त्यांना पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक चमत्कार म्हणजे माणसांचे जुळे असणे. तुम्ही अनेकवेळा जुळे बहीण-भावाविषयी ऐकले किंवा पाहिले असेल पण जुळे पती-पत्नी असल्याचे कधी ऐकलंय का? आम्ही तुम्हाला अशाच एका जुळ्या विवाहीत जोडप्याविषयी सांगत आहोत. 

 

 

रशियातील पती-पत्नी दाम्पत्याचा चेहरा दिसायला एकसारखाच आहे. यांना पाहिल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की, असे कसे पती-पत्नी असू शकतात. यामुळे लोक हैराण झाले आहेत. या विशषतेमुळे हे दाम्पत्य त्यांच्या देशात प्रसिद्ध आहे. पतीचे नाव अलीना तर त्यांच्या पत्नीचे नाह अलीसा आहे. 

 

लोकांचा बसत नाहीये विश्वास

अलीना आणि अलीसा अनेकवेळा सोबतच घराबाहेर पडतात तेव्हा त्यांना ओळखणे फार कठीण जाते. इतकेच नाही तर लोकांना भ्रमात टाकण्यासाठी दोघे पती-पत्नी बऱ्याचवेळा वेगवेगळ्या प्रकारची गंमत करत असतात. अनेकवेळा एकसारखेच कपडे परिधान केल्यामुळे लोक त्यांना ओळखण्यात चूक करतात. कधी कधी तर दोघेही एकमेकांचे नाव बदलून गप्पा मारतात

अलीना आणि अलीसा यांच्या कारनाम्यांमुळे ते दोघे पती-पत्नी असल्यावर लोकांचा विश्वासच बसत नाही. मीडिया रिपोर्ट्सच्या मते. दोघांचेही लव्ह मॅरेज झालेले आहे. 

 

या दोघांबाबतची एक खास बाब म्हणजे त्यांच्या घरातील सदस्य देखील त्यांना ओळखण्यात चूकतात.  या जोडीचे 2016 मध्ये सर्वप्रथम फोटो व्हायरल झाले होते पण त्यानंतर आतापर्यंत कधीही असे जुळे पती-पत्नी बघावयास मिळाले नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...