Twitter / Hacked! ट्विटरच्या सीईओंचेच ट्विटर अकाउंट झाले हॅक, हॅकर्सने केले आक्षेपार्ह ट्विट्स

OMG! ट्विटरच्या संस्थापक-सीईओंचेच अकाउंट झाले हॅक

वृत्तसंस्था

Aug 31,2019 12:00:00 PM IST

वॉशिंग्टन - सोशल मीडिया अकाउंट हॅक केवळ सामान्यांचेच नाही तर ते बनवणाऱ्यांचे देखील हॅक केले जाऊ शकतात. याचेच एक ताजे उदाहरण शुक्रवारी समोर आले आहे. सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे संस्थापक सीईओ जॅक डॉर्सी यांचे ट्विटर अकाउंटच हॅक झाले आहे. केवळ हॅकच नव्हे, तर त्यावरून काही वर्णद्वेषी ट्विट सुद्धा करण्यात आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, हे ट्वीट अर्धा तास त्यांच्या प्रोफाइलवर दिसत होते. यानंतर त्यांच्या ट्विटर टीमने अकाउंट पूर्ववत केले. डॉर्सी यांचे 42 लाख फॉलोअर्स आहेत.


ट्विटरकडून जारी करण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, या हॅकिंगच्या घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे. हॅक झालेल्या अकाउंटचे आक्षेपार्ह ट्विट ज्या लोकांनी रीट्विट केले, त्या सर्वांचे अकाउंट देखील तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. सोबतच, काही अकाउंट्सवर संशय असल्याने ते बंद करण्यात आले आहेत. चकल स्क्वाड नावाच्या एका समूहाने या हॅकिंगची जबाबदारी घेतली आहे. जॅक यांचे अकाउंट हॅक झाल्यानंतर हॅकर्सने हिटलर आणि नाझीवादाचे समर्थन करणारे ट्विट केले. यानंतर स्वतः जॅक यांच्यावर वर्णद्वेषी टीका देखील केली. आणखी एका ट्विटमध्ये हॅकर्सने ट्विटरच्या मुख्यालयात बॉम्ब असल्याची अफवा सुद्धा पसरवली. कंपनीने हे सर्वच मेसेज डिलीट केले आहेत.

X
COMMENT