आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Twitter India Celebrates World Hashtag Day, Most Hashtags On South Indian Movie '# Vishwasam'

ट्विटर इंडियाने सेलिब्रेट केला वर्ल्ड हॅशटॅग डे, साउथ इंडियन चित्रपट '#विश्वासम' वर सर्वात जास्त हॅशटॅग 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ट्विटर इंडियाने 23 ऑगस्ट वर्ल्ड हॅशटॅग डे म्हणून साजरा केला. यादरम्यान ट्विटर इंटरनेट डाटाने 1 जानेवारी 2019 पासून 30 जून 2019 पर्यंत टॉप 5 हॅशटॅगची लिस्ट जारी केली होती. ज्यामधे साउथ इंडियन स्टार अजीतचा चित्रपट 'विश्वासम' पहिल्या नंबरवर राहिला. तर महेश बाबूचा चित्रपट 'महर्षी' चौथ्या क्रमांकावर होता. 
 

हे आहेत टॉप 5 हॅशटॅग... 
ट्विटर इंडियाने 2019 चा पहिला सहा महिन्यांमध्ये सर्वात जास्त वापरले गेलेल्या हॅशटॅगची लिस्ट जारी केली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर 'विश्वासम', दुसऱ्या क्रमांकावर 'लोकसभा इलेक्शन 2019', तिसऱ्या क्रमांकावर 'CWC19' होते. चौथ्या क्रमांकावर 'महर्षी' आणि पाचव्या क्रमांकावर 'न्यू प्रोफाइल पिक' शब्द सर्वात जास्त वापरला गेला होता.  
 

 

यासाठी साजरा केला जातो हा दिवस... 
ट्विटर इंडियाने आपल्या हँडलवर हा दिवस साजरा करण्याचे कारण सांगितले. हॅशटॅगचे इन्व्हेंटर क्रिस मेसिना आहे. क्रिसने ऑगस्ट 2007 मध्ये सर्वात आधी हॅशटॅगबद्दल माहिती दिली होती. 

बातम्या आणखी आहेत...