आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Twitter Is Launching A New Feature To Control Trollers, You Can Control The Response Of User On Your Posts

ट्रोलर्सला रोखण्यासाठी ट्विटर घेऊन येत आहे नवीन फीचर, यूजर पोस्टचे रिप्लाय नियंत्रित करता येणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस व्हेगास : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरच नवे फीचर लॉन्च करणार आहे. या फीचरद्वारे यूजर्स आपल्या कोणत्याही पोस्टवर येणारे रिप्लाय कंट्रोल करू शकणार आहते. म्हणजे आत तुम्ही हे ठरवू शकता की, तुमच्या पोस्टवर कोण रिप्लाय करू शकते आणि कोण नाही. याचा फायदा हा होईल की, यूजर ट्रोलर्सला कंट्रोल करू शकतील. 


नवे फीचर लागू करण्यापूर्वी कंपनीयाचे ट्रायल करेल. अमेरिकेच्या लॉस व्हेगासमध्ये सुरु असलेल्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो (सीईएस-2020) दरम्यान कंपनीने नव्या फीचरबद्दल माहिती दिली.  
ट्विटरच्या प्रोडक्ट मॅनेजमेंटचे डायरेक्टर सुजान शी म्हणाले - ट्विटरवर कामाचे आणि चांगले बोलणारे लोक आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. आम्ही त्यांना त्यांनी सुरु केली बातचीत आणखी प्रबळ करण्यासाठी काम करू इच्छितो. या फीचरद्वारे यूजर्सकडे आपल्या ट्वीटवर आलेले रिप्लाया हाइड करण्याची सुविधा असेल. 

हे 4 ऑप्शन मिळतील ट्रोलर्सला कंट्रोल करण्यासाठी... 

  • स्टेटमेंट : जर तुम्ही हा ऑप्शन निवडला तर तुमच्या पोस्टवर कोणतीच व्यक्ती रिप्लाय करू शकणार नाही.
  • पॅनल : हे निवडल्यास यूजरच्या पोस्टवर केवळ तेच लोक रिप्लाय करू शकतील, ज्यांना पोस्टमध्ये टॅग केले गेले आहे.
  • ग्रुप : हा ऑप्शन निवडल्यास ज्यांना तुम्ही फॉलो करता, किंवा ज्यांचा उल्लेख करता, केवळ तेच लोक कमेंट करू शकतील.
  • ग्लोबल : जर एखादा यूजर हा ऑप्शन निवडतो तर त्याच्या पोस्टवर कुणीही रिप्लाय करू शकते.