आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भारत' च्या प्रमोशनसाठी ट्विटरने लॉन्च केले खास ईमोजी, सलमानचा 70 वर्षांचा लुक केला फीचर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : माक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने सलमान खानची अपकमिंग फिल्म भारतच्या प्रमोशनसाठी खास ईमोजी लॉन्च केले आहे. ट्विटर आणि रील लाइफ प्रोडक्शनच्या भागीदारीमुळे ऑफिशियल ईमोजी लॉन्च केला गेला आहे. 'भारत' मध्ये सलमान 70 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या रोलमध्ये दिसणार आहे. हे ईमोजी सलमानच्या लुकला पाहून फीचर केले गेले आहे. 

 

सलमानने सोमवारी ट्विटरवर आपल्या फॅन्ससोबत ईमोजी शेअर केले होते.  

 

"Here is the official Bharat emoji! Tweet using #Bharat#BharatThisEid#IAmBharat#BharatWithFamily
To see it!

 

Thank you @TwitterIndia !@Bharat_TheFilm @aliabbaszafar @atulreellife @itsBhushanKumar #KatrinaKaif @nikhilnamit @reellifeprodn @SKFilmsOfficial @TSeries"

 

 

ट्विटर एशिया पॅसिफिकचे हेड ऑफ कंटेट पार्टनरशिप राहुल पुष्करणने सांगितले, 'फॅन्स ट्विटरवर आपल्या आवडत्या फिल्मचे आणि स्टार्ससोबत बातचीत आणि त्यांच्याशी जोडल्या जाणाऱ्या पर्यायांना पसंत करतात. आम्ही जगभरातील फॅन्स आणि सलमानच्या जोडले जाणे वाढवू इच्छितो.'

 

सलमान खान सध्या 'भारत' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. फिल्ममध्ये सलमानसोबत कतरिना कैफ, दिशा पाटणी, सुनील ग्रोवर, जॅकी श्रॉफ आणि नोरा फतेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. फिल्म 5 जूनला रिलीज होईल.