आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टि्वटर बंद करणार राजकीय जाहिराती, नेते सोशल मीडियावर अफवा पसरवत असल्याने घेतला निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेसबुकचे सीईओ म्हणाले, जाहिरातीवर बंदी घातल्याने फक्त सत्ताधाऱ्यांना फायदा
  • सीईओ जॅक डोर्सी यांनी ११ टि्वटद्वारे केली घोषणा, नियम २२ नोव्हें.पासून लागू

​​​​​​वॉशिंगटन : ट्विटर आता जगभरात आपल्या प्लॅटफॉर्मवर राजकीय जाहिराती देणार नाही. टिवटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी गुरुवारी रात्री ११ वाजता टि्वट करून यासंदर्भात घोषणा केली आहे. सोशल मीडियावर राजकीय नेत्यांकडून अफवा पसरवण्यात येत असल्याने आपण हा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक जाहिरातदारांसाठी इंटरनेट हे खूप प्रभावी माध्यम ठरते. परंतु राजकीय क्षेत्रात खूप मोठी जोखीम असते. तर फेसबुकचे सीईओ मार्क जुकेरबर्ग यांनी जाहिरातीवर बंदी आणल्याचा राजकारण्यांनाच फायदा होईल असे म्हटले. जॅक डोर्सी यांनी सलग टि्वट करताना म्हटले, आम्ही टि्वटरवर सर्व प्रकारच्या राजकीय जाहिरातींना बंदी घालणार आहोत. राजकीय जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना फक्त संदेश गेला पाहिजे. त्यांना विकत घेण्याचा संदेश नको. एक राजकीय संदेश लोकांपर्यंत पाेहचण्यासाठी त्यांना एखादय्ा अकाऊंटला फॉलो करावे लागते अथवा रिटि्वट करावे लागते. तरच याचा त्यांना फायदा होईल. या निर्णयास पैशाने तडजोड करू नये, असे आम्हाला वाटते. आजच्या काळात इंटरनेट जाहिरात देण्यासाठी प्रबळ प्लॅटफॉर्म झाले आहे. हे राजकारणासाठी धोक्याचे ठरू शकते. राजकीय जाहिरातीने मते खेचली जाऊ शकतात.

राजकीय जाहिराती इको यंत्रणेचा एक छोटा भाग : डोर्सी
डोर्सी म्हणाले, नव्या धोरणांची सविस्तर माहिती पुढील महिन्यात देण्यात येईल. नवे नियम २२ नोव्हेंबरपासून लागू होतील. राजकीय मुद्द्याबरोबरच उमेदवारांच्या जाहिरातीवरही बंदी राहिल. सुरुवातीला फक्त उमेदवारांच्या जाहिरातीवर बंदी घालणार होतो. परंतु त्यांना ज्या मुद्द्यावर भर द्यायचा आहे, त्याच जाहिराती ते विकत घेतील ते योग्य नाही. आम्ही खूप मोठ्या राजकीय जाहिराती इको सिस्टिमचा एक छोटा भाग आहोत. काही मंडळी अामच्या कामावर चर्चा करू शकतात. परंतु अनेक सामाजिक आंदोलने कसलीही राजकीय जाहिरातबाजी न करताही लोकांपर्यंत पोहचू शकतात, हे आम्ही अनुभवले आहे.

डेमॉक्रेटिक नेत्या हिलरी यांनी या निर्णयाचे केले स्वागत
अमेरिकेतील डेमॉक्रेटिक नेत्या हिलरी क्लिंटन यांनी राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्याच्या टि्वटरच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी फेसबुकलाही यावर विचार करण्याचे आवाहन केले आहे. टि्वटरचे मुख्य वित्तीय अधिकारी नेड सहगल यांनी म्हटले, या निर्णयामुळे आर्थिक उत्पन्नावर परिणाम होणार आहे. परंतु येथे तत्वाचा प्रश्न येतो. पैशाचा नाही. फेसबुकचे सीईओ मार्क जुकेरबर्ग यांनी म्हटले, राजकीय जाहिराती महसुली उत्पनाचे मुख्य स्त्रोत नाहीत. परंतु कोणालाही आवाज उठविण्याचा हक्क आहे. परंतु जाहिरातीवर बंदी घातल्याने सत्ताधाऱ्यांना फायदाच होणार आहे.