आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमिळ सिंगर चिन्मयी श्रीप्रदाकडून एका ट्विटर यूझरने मागितले न्यूड फोटो, चिन्मयीने दिले चोख प्रत्युत्तर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क- तेलुगू आणि तमिळ चित्रपटात गाणे गाणारी सिंगर चिन्मयी श्रीप्रदाला मीटू मूव्हमेंटमध्ये आवाज उठवल्याची किमंत भोगावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी एका ट्विटर यूझरने तिला न्यूड फोटो मागितले. त्याला उत्तर देताना तिने जे फोटोज पाठवले, ते पाहून त्याची बोलती बंद झाली. तिच्या या उत्तराची इतर युझर्सकडून प्रंशसा केली जात आहे. 


कॉस्मेटिक्सचे फोटो पाठवले
यूझरला रिप्लाय देताना चिन्मयीने न्यूड कलरच्या कॉस्मेटिक्स चे फोटोज पाठवले आणि त्यासोबत लिहीले- "माझे काही आवडीचे न्यूड्स." चिन्मयीने या चॅटचा स्क्रीन शॉट ट्विटरवर पोस्ट केला, त्यानंतर इतर युझर्स तिची प्रशंसा करत आहेत. 


डबिंग यूनियनने केले आहे बॅन
चिन्मयीने "मीटू मूव्हमेंट" दरम्यान गीतकार वैरामुथू आणि राधा रवीवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. या आरोपानंतर चिन्मयीला डबिंग यूनियनने बॅन केले आहे. त्यासोबतच तिला तमिळ फिल्म इंडस्ट्रीच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. 

 

 


अकाउंटचे नाव बदलून केले प्रायव्हेट
चिन्मयीकडून स्क्रीन शॉट ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर त्या तरूणाने आपल्या अकाउंटचे नाव बदलून प्रायव्हेट केले आहे.