आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात ट्विटर, फेसबूक आणि वॉट्सअॅप चालवण्यावर आहे बंदी, युझर्सना मिळते शिक्षा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सोशल नेटवर्किंग साइट्स लोकांसोबत जोडण्याचा चांगला पर्याय आहे. या माध्यमातून दुरवर असलेल्या लोकांसोबत तुम्ही बोलु शकता. सोशल मीडीयाने लोकांमधील अंतर कमी केले आहे. सध्या सोशल मीडीयाचा वापर खुप वाढला आहे आणि यामुळे लोकांच्या मनातील भावनांचे त्यांच्या विचारांचे आदान प्रदान होते. अशातच आता सोशल मीडीयाला बॅन केले तर काय होईल. आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगणार आहोत जिथे सोशल मीडीयावर बॅन आहे.

 
चीनमध्ये फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअॅपवर बंदी आहे
जगातील फाटेस्ट ग्रोइंग देशाने सोशल मीडीयावर बंदी घातली आहे. याचा वापर केला तर चीनमध्ये शिक्षा दिली जाते. येथे फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअॅपवर पूर्णपणे बंदी आहे, पण यामागे एक सुरक्षा कारण आहे. खरतर ट्विटर मोठ्या प्रमाणात ऑनलाइन द्वारे सोशल रेवेल्यूशन आणण्यास कराणीभूत आहे आणि त्यामुळेच त्याला बॅन करण्यात आले आहे. चीनमध्ये या साइट्सने राजकारणावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे मागच्या वर्षापासून सोशल साइट्सवर बंदी आणली आहे.


पोलिसांनी केले अटक 
चीनी कार्यकर्ते आणि इतर टि्वटर यूझर्सने म्हटले की, पोलिस त्यांच्यावर संवेदनशील ट्विट काढण्याचा दबाव टाकत आहेत. एका ट्विटर यूझरने सांगितले की, कम्यूनिस्ट पार्टीविरोधात टाकलेल्या ट्विटमुळे त्याला अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...