यावलला परीक्षा केंद्रावर / यावलला परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; पेपर सुटल्यानंतर घडला हा प्रकार

प्रतिनिधी

Mar 05,2019 04:04:00 PM IST

यावल- साने गुरुजी विद्यालयातील इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रावर पेपर सुटल्यानंतर दोन विद्यार्थ्यांना पंचवीस ते तीस जणांच्या जमावाने बेदम मारहाण केल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेनंतर घडली. दोघे जखमी विद्यार्थ्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली.

साने गुरुजी विद्यालयात इयत्ता दहावीची परीक्षा केंद्र आहे. मंगळवारी या परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. परवेज मुसा तेली (वय-19, रा.चोपडा) व दानिश इरफान बेग (वय-22, रा. चोपडा) हे परीक्षा देण्यासाठी आले होते. पेपर सुटल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास परीक्षा केंद्राच्या आवारातच त्यांना शहरातील वीस ते पंचवीस जणांच्या गटाने हातात लाठ्या-काठ्या घेऊन चेहऱ्यावर रुमाल बांधून या दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.यात दोघांचे डोके फुटले. पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. परीक्षा केंद्र बंदोबस्तासाठी असलेले पोलिस व काही नागरिक तसेच शिक्षक भूषण नगरे, विनोद गायकवाड आदींनी या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांपासून सोडवले. दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉ.शुभम जगताप, प्रियांका मगरे आदींनी दोघांवर प्रथमोपचार केले. दोघांना जळगाव येथे हलवण्याची तयारी सध्या सुरू असून तत्पूर्वी पोलिसांकडून त्यांचे जबाब घेतले जात आहे.

या प्रकारामुळे शहरात खळबळ
शहरात साने गुरुजी विद्यालय तसेच डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल अशी दोन परीक्षा केंद्र आहेत. बारावी व दहावीच्या सध्या परीक्षा सुरू असून दोन्ही केंद्रावर टारगट आणि कॉपी बहाद्दर यांचा सुळसुळाट असतो. यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे आली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

X
COMMENT