आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या कुशीत झोपली होती मुलगी, नराधमाने बलात्कार करून केला खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आईच्या कुशीत झाेपलेल्या एका अडीच वर्षच्या मुलीचे मध्यरात्री अनाेळखी व्यक्तीने अपहरण करत मुलीवर बलात्कार करून तिचा खून करून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना पिंपळे साैदागर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी फरार आराेपीचा पाेलिसांनी शाेध सुरू केला आहे. 


पीडित मुलीचे आई-वडील माेलमजुरीचे काम करत असून ते मुळ छत्तीसगड येथील रहिवासी आहेत. पिंपळे साैदागर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी ते  काम करून राहतात. मंगळवारी मध्यरात्री चिमुरडी ही तिच्या आईजवळ झाेपली हाेती. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमाारास अनाेळखी व्यक्तीने झाेपलेल्या मुलीस अलगद उचलून नेले. दरम्यान, पहाटेच्या सुमारास मुलीचे आईला जाग आल्यानंतर मुलगी न दिसल्याने त्यांनी मुलीचा शाेध सुरू केला. त्यावेळी मुलगी काेठेही सापडत नसल्याने त्यांनी अखेर सांगवी पाेलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात तक्रार दिली. पाेलिसांनी मुलीचा शाेध सुरू केल्यानंतर मंगळवारी मुलीचा मृतदेह पिंपळे साैदागर परिसरातील लष्कराच्या हद्दीतील माेकळया जागेत नाल्याजवळ सापडला. पाेलिसांनी पंचनामा करत मृतदेह आैंध रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. 

 

महिला आयाेगाच्या अध्यक्षांनी दिली भेट
या घटनेची तत्काळ दखल घेत राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या वेळी पिंपरी-चिंचवड आयुक्तलयाचे अप्पर पाेलिस आयुक्त रामनाथ पाेकळे त्यांच्यासाेबत हाेते. पाेलिसांनी याप्रकरणात तातडीने तपास करून आराेपीला जेरबंद करावे, अशा सूचना रहाटकर यांनी दिल्या. पीडित मुलीचे शवविच्छेदन अहवालात अमानुष लैंगिक अत्याचार करुन तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...