आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या घरी नेहमी खेळायला जायची अडीच वर्षांची चिमुकली, एका दिवशी आईला रडतच मारली मिठी, अन् वेदनेने विव्हळत घेतले मित्राच्या वडिलांचे नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर- येथील एका कॉलनीत मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी चिमुकली तिच्या मित्राच्या घरी खेळायला गेली होती. तेथून परत आल्यावर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना सुरू झाल्या. तिच्या आईने तिला विचारल्यावर तिने मित्राच्या वडिलांनी अश्लील कृत्य केल्याचे सांगितले.

 

41 वर्षांच्या नराधमाने अडीच वर्षांच्या चिमुकलीसोबत केले कुकृत्य

टिळकनगर ठाण्याच्या इंचार्ज पल्लवी शुक्ला यांनी सांगितले की, परिसरातील ही एक पॉश कॉलनी आहे. येथील एक महिला आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला पोलिस ठाण्यात घेऊन आली आणि घराजवळ राहणाऱ्या विक्कीविरुद्ध अश्लील कृत्य केल्याची तक्रार दाखल केली. मुलीच्या वैद्यकीय तपासणीत समोर आले की, तिच्यासोबत कुकृत्य झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी 41 वर्षांच्या आरोपी विक्कीला अटक केली आहे. 

 

चिमुकलीच्या वेदना पाहून आईला बसला धक्का

आईने सांगितले की, मुलगी आरोपीच्या मुलासोबत खेळत होती. थोड्यावेळानंतर ती घरी आल्यावर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखणे सुरू झाले. मुलीने तिच्या आईला मिठी मारून रडणे सुरू केले. घाबरलेल्या चिमुकलीला काहीच बोलता येत नव्हते, पण थोड्या वेळाने तिने सांगितले की, विक्कीने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले.

 

 

बातम्या आणखी आहेत...