आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 लाख रुपये किमतीच्या मेफेड्रोन या मादक द्रव्यांसह अंधेरीतून दोघांना अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सुमारे 40 लाख रुपये किमतीच्या 1 किलो वजनाच्या मेफेड्रोन या मादक द्रव्यासह दोघांना मुंबईतील अंधेरी भागातून अटक करण्यात आली आहे.

 

अंबोली पोलिसांना यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती.  त्यानुसार, त्यांनी विरा देसाई मार्गावर इम्रान अब्दुल खालिद अन्सारी (32) आणि अफझल हुसैन मुमताज अली अन्सारी (38) यांना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे एक किलो मेफेड्रोन आढळून आले. शिवाय, त्यांच्याकडून प्लास्टिकच्या छोट्या बॅग, वजन काटा आणि मोबाइलसोबत काही रोख रक्कमही जप्त केली आहे. दोघांवरही मादक द्रव्य तस्करी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...