आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Two Bank Staff Booked For Swindling Money From Dead Customer Account In Tamil Nadu News And Updates

ग्राहकाच्या मृत्यूनंतर खात्यावर होते 25.80 लाख रुपये, बँकेने परस्पर काढून घेतले; दोघांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑडिटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला घोटाळा
  • शाखा व्यवस्थापकासह, सहाय्यक व्यवस्थापकाला अटक

तिरुचापल्ली - बँकेतील ग्राहकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या खात्यातील रक्कम चोरल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये शाखा व्यवस्थापक आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या दोघांनी मिळून मृत व्यक्तीच्या खात्यात असलेले 25 लाख 80 हजार रुपये परस्पर काढून वाटणी केली. या प्रकरणी शाखा व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीच्या खात्यातून असे चोरले 25.80 लाख रुपये

तामिळनाडूच्या वायालूर येथील शाखेत इंडियन ओव्हरसीस बँकेत हा घोटाळा समोर आला आहे. या बँकेच्या शाखेत एमिसोला नावाच्या एका महिला ग्राहकाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. निधनानंतर कुठल्याही व्यक्तीने त्यावर दावा केला नाही किंवा कुठलाही नातेवाइक समोर आला नाही. याचाच गैरफायदा यामध्ये काम करणारे बँक व्यवस्थापक शेख मोहिदीन आणि चिन्नादुरई यांनी घेतला. या दोघांनी मिळून एक एटीएम कार्ड अर्ज केला. त्यावर एमिसोला यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या. याच एटीएमच्या माध्यमातून त्यांनी फसवणूक करत 25 लाख 80 हजार रुपये काढले.

असा उघडकी आला बँक घोटाळा

वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांनी नुकतेच झालेल्या व्यवहारांचे ऑडिट पाहिले असताना त्यांना एक अनपेक्षित गोष्ट निदर्शनास आली. एका ठराविक खात्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून शून्य व्यवहार असताना अचानक मोठी रक्कम काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते खाते एमिसोला यांचेच होते. आणखी चौकशी केली तेव्हा हे खाते नव्याने रिन्यू करून एटीएम सुद्धा बहाल केल्याचे दिसले. मृत व्यक्तीच्या खात्यावर अचानक एवढे व्यवहार कसे झाले याची चौकशी करण्यात आली. यानंतर मोहिदीन आणि चिन्नादुरई यांचे पितळ उघडले पडले.

बातम्या आणखी आहेत...