Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Two bhondubaba arrested in nagar

नरबळी देण्याची मागणी करणाऱ्या दोन भोंदूबाबांना अटक

प्रतिनिधी | Update - Aug 12, 2018, 12:14 PM IST

महिलेच्या अंगात येणारे काढण्यासाठी नरबळी अथवा एक लाख रुपये देण्याची मागणी करणाऱ्या परराज्यातील दोन भोंदूबाबांना एमआयडीसी

  • Two bhondubaba arrested in nagar
    नगर - महिलेच्या अंगात येणारे काढण्यासाठी नरबळी अथवा एक लाख रुपये देण्याची मागणी करणाऱ्या परराज्यातील दोन भोंदूबाबांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ अटक केली. पिरसाहब ऊर्फ अब्दुल गफ्फार खलिफा व सद्दाम सलीम तवर (दोघे रा. फत्तेवार शेखावटी, जि. सिक्कर, राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    एमआयडीसी परिसरातील सुरूची डेअरी, एक्स ०१ ब्लॉक या दुकानात छापा टाकून पोलिसांनी ही कामगिरी केली. पोलिसांनी तक्रारदाराची नावे गोपनीय ठेवली आहेत. तक्रारदार यांच्या बहिणीच्या अंगातील काढण्यासाठी नरबळी द्यावा, अथवा एक लाख रुपये द्यावेत, अशी मागणी या भाेंदूबाबांनी केली होती. मूल होत नसेल, सासू सासरे चांगली वागणूक देत नसतील, तसेच अंगात येणारे काढण्यासाठी हे भाेंदूबाबा जादूटोणा करत नागरिकांची फसवणूक करत होते. दोघांची झडती घेतली असता उदी, अगरबत्ती, पावडर व नऊ हजारांची रोकड त्यांच्याकडून हस्तगत केली. राहुरी, लोणी, कोल्हार, श्रीरामपूर आदी ठिकाणी अनेकांना गंडा घातल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपींनी ७७१९९४३३०८, ९११२६५४६९२ व ८२६८३७६९६७ या क्रमांकावरून फोन करून कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एमआयडीसी ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केले आहे.

Trending